Rahul Narwekar : ठाकरे गटाने केलेल्या आरोपांचा नार्वेकरांनी एका वाक्यातच निकाल लावला; म्हणाले...

Uddhav Thackeray : 2018 मधील घटना दुरुस्ती केली ती ग्राह्य धरायची की 1999 ची, हाच मुद्दा महत्त्वाचा
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदें सत्तासंघर्षाच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालविरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, नार्वेकरांनी भाजपधार्जिना निकाल दिल्याचा आरोप विरोधकांनी करत टीकेची झोड उठवली. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी निकालाची काही पुरावे देत चिरफाडच केली. हे सर्व आरोप नार्वेकरांनी आपल्या रोखठोक भाषेत झटकत ठाकरे गटाला सूचक इशाराही दिला.

आमदार अपात्रतेचा निकाल कुणाला संतुष्ट करायला दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहुनच निकाल दिला. आता त्याविरोधात संविधानानुसार कुठलाही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो. Uddhav Thackeray ठाकरे गटाने निकालाविरोधात याचिका दाखल केली म्हणजे निकाल चुकीचा ठरत नाही. निकालात काय चुकीचे आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. माझ्या निकालावर बोलण्यापेक्षा त्यांनी घटना दुरुस्तीकडे लक्ष दिले असते तर बरे झाले असते, असा खोचक टोलाही नार्वेकरांनी लगावला आहे.

Rahul Narwekar
Milind Deora : लोकसभा की राज्यसभा; आता मिलिंद देवरांच्या उमेदवारीचा प्रश्न कायम...

अनिल परब (Anil Parab) यांनी शिवसेनेची झालेली घटना दुरुस्तीबाबत सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे पुरावे दिले आहेत. त्या पुराव्यावरच सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. परबांचा दावा नार्वेकरांनी एका झटक्यातच उडवून लावला. परबांनी दाखवलेले कागदपत्र दुसरेच असल्याचा दावाही त्यांनी केला.

नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, '4 एप्रिल 2018 च्या पत्रात केवळ पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचे निकाल आयोगाला कळवले होते. घटनेत जे काही बदल केला त्याबाबत माझ्याकडे दिलेल्या पत्रात उल्लेखही नव्हता. त्यामुळे परब यांचं हे पत्र सर्वोच्च न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे. आता 2018 ची घटना दुरुस्ती की 1999 घटना ग्राह्य धरायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे,' याकडेही नार्वेकरांनी लक्ष वेधले.

Rahul Narwekar
Marathwada Water Crisis : दुष्काळात तेरावा महिना; राजेश टोपेंनी थेट मुद्द्यावरच बोट ठेवलं

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटासह विरोधक आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनीही ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. आता ठरल्याप्रमाणे ठाकरेंनी याचिका दाखल केली आहे. आता नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार असल्याचा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत नार्वेकर म्हणाले, 'मी दिलेल्या निर्णयात काय चुकीचे ते त्यांनी सांगावे. माझ्या निर्णयात बेकायदेशीर काय ते स्पष्ट करावे. पत्रकार परिषद घेऊन निर्णय बदलणार नाही. ठाकरे माझ्या निकलाव्यतिरिक्त फक्त टीका, आरोप करणार असतील तर जनता निकाल द्यायला सूज्ञ आहे,' असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Narwekar
Shrikant Shinde : डोंबिवलीतील 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या कार्यक्रमास यंदा खासदार शिंदेंचा 'विशेष' हातभार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com