Ashish Shelars ON Aditya Thackeray : 'मातोश्री' बाहेर डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे पावसावर बोलणार ?

Maharashtra Politics : शेलारांनी टि्वट करीत ठाकरेंनी दिलेली माहिती कशी चुकीची आहे, हे सांगितलं आहे,
Ashish Shelars, Aditya Thackeray
Ashish Shelars, Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पहिल्याच पावसात (Heavy Rains) रविवारी मुंबईची दाणादाण झाली. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहतूक मंदावली होती. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.यंदा रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच कुठलेही मुंबईकरांना त्रास देखील होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण त्याचे हे आश्वासन फोल ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

यावर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती. त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. शेलारांनी टि्वट करीत आदित्य ठाकरेंनी रविवारी दिलेली माहिती कशी चुकीची आहे, हे सांगितलं आहे,

Ashish Shelars, Aditya Thackeray
Ganeshotsav Special Trains : गणेश भक्तांसाठी गुड न्यूज ; गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा..

एवढा पाऊस कधी पडला?

आशिष शेलारांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. "मातोश्रीच्या युवराजांनी, आपल्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले, असा दावा केला आहे. पण मुंबईत एका तासात 400 मिमी एवढा पाऊस कधी पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत 26 जुलै 2005 ला सुद्धा एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता, असे सांगत शेलारांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

होड्या सोडायच्या वयात हे..

"मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी," असा टोलाही शेलारांनी आपल्या टि्वटमध्ये लगावला आहे.

Ashish Shelars, Aditya Thackeray
Sanjay Sawant slams Gulabrao Patil : गुलाबरावांनी मंत्रीपदासाठी किती वेळा राऊतांच दार ठोठावलं, हे सांगावं..

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे..

रविवारी ज्या-ज्या मुंबईकरांनी ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर, पाणी जिथे तुंबलं तिथे अडकल्यानंतर फोटो ट्वीट केलं आणि काही अशा ठिकाणी पाणी तुंबलं जिथे कधीच तुंबलं नव्हतं. जसं छत्रपती शिवाजी पार्कचा परिसर, अंधेरीमध्ये काही ठिकाणी, पण पाणी तुंबल्यानंतर काल कोणी मुंबई पालिकेमधलं त्या ठिकाणी दिसलचं नाही. रस्त्यावर कुठे पालिकेचे अधिकारी नव्हतेचं. घटनाबाह्य मुंख्यमत्री ते कुठे होते, कुठल्या शेतावर कुणालाच काही माहित नाही. पण जे मी आज मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट पाहिलं मुंबईकर म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला राग आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं की, पाऊस आल्याचं स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबल्याची तक्रार काय करता. हे स्टेंटमेंट म्हणजे निर्लज्ज पणाचं, नाकर्तेपणाचं आणि भ्रष्टाचारचं कुठला चेहरा असेल तर ते खोके सरकार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com