Ashok Chavan : चेन्नीथलांना आव्हान, राऊतांना प्रत्युत्तर, बाबांना टोला; काँग्रेस सोडण्याचं कारणंही चव्हाणांनी सांगितलं

Ashok Chavan On Rajyasabha Election 2024 : "बऱ्याच दिवसांनी दोन जणांना नांदेडमधून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे," असं चव्हाणांनी सांगितलं.
Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay raut
Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत तीन जणांची नावं आहेत. त्यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपतील प्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी चव्हाणांना राज्यसभेचा उमेदवार घोषित करण्यात आलं. "हे म्हणजे दुधात साखर," अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी ( Ashok Chavan ) दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay raut
Ashok Chavan News : भाजपचं आधीच ठरलं होतं! म्हणून चव्हाणांचा पक्षप्रवेश तातडीनं

अशोक चव्हाण म्हणाले, "दुधाबरोबर साखर म्हणतात, तसं हा आनंदाचा क्षण आहे. बऱ्याच दिवसांनी दोन जणांना नांदेडमधून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून भाजपचाच खासदार निवडून येईल. नांदेडमधून एकून तीन खासदार असतील, अशी आशा मी बाळगतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'छोटे-मोठे रावण घेऊन २०२४ ची निवडणूक जिंकण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आली आहे,' असं वक्तव्य खासदार ( ठाकरे गट ) संजय राऊतांनी केलं. याकडे लक्ष वेधलं असता, चव्हाणांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, "काही दिवस रावण म्हणतील. काही दिवस राम म्हणतील. काय बोलायचं ते बोलुद्या.... मला त्यांच्या वक्तव्यावर काहीच बोलायचं नाही. शेवटी जनतेच्या मतांवर निवडून यायचं आहे. नांदेडच राजकीय बलस्थान अबाधित राहील. नांदेडमधून भाजपचा खासदार निवडून आणणारच."

Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay raut
Prakash Ambedkar : "मुर्मूंच्यापूर्वी भाजपकडून मला राष्ट्रपतीपदाची ऑफर होती, पण...", आंबेडकरांचा गौप्यस्फोट

'चव्हाणांना उपमुख्यमंत्रीपद किंवा सार्वजनिक बांधकाम खातं पाहिजे होते. पण, राज्यसभेवर बोळवण करण्यात आली,' असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण सांगितलं, "माझ्या मनात काय आणि माझी मागणी काय, हे त्यांना कसं कळलं हा संशोधनाचा विषय आहे. पण, पृथ्वीराज चव्हाणांना मी शुभेच्छा देतो. मी गेल्यानंतर एकतरी चव्हाण महाराष्ट्रात आहेत."

Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay raut
Narayan Rane : "आपली औकात ओळखावी अन् अंथरूणावर पडून राहावं, अन्यथा...", राणेंचा जरांगेंना इशारा

'चव्हाण डरपोक असून मैदान सोडून पळाले,' अशी टीका काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांनी केली होती. यावर प्रतिनिधीनं प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, "एवढी वर्षे आम्ही घाबरलो नाही. कोणाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. राजकारणात आरोप केले जातात. मी त्यांच्याकडून प्रशंसेची अपेक्षा बाळगत नाही. गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. मेहनत केल्यानं राजकारणात यशस्वी झालो. सध्या काँग्रेसची जबाबदारी चेन्निथलांकडे आहे. त्यांनी हिंमत दाखवावी. त्यांच्या ताकदीनं काँग्रेसला काय मिळते, हे जनता पाहिल."

Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay raut
Raju Patil : जरांगेंची प्रकृती खालावली, राजू पाटलांनी सरकारला सुनावले खडेबोल; म्हणाले...

काँग्रेस सोडण्याचं कारण नाही सांगितलं, या प्रश्नावर चव्हाणांनी म्हटलं, "मला वाटलं चांगली संधी आहे. दुसरं कारण काय असू शकते? मी राज्यसभेसाठी भाजपत गेलो नाही. माझा मतदारसंघ सुरक्षित आहे. राज्यसभेत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी एका रात्रीत भाजपत गेलो नाही. मी शेवटपर्यंत काँग्रेसचं काम केलं आहे. जेव्हा निर्णय घेतला, तेव्हापासून काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हतो. यात काय चुकीचं आहे?"

Ashok Chavan prithviraj chavan ramesh chennithala sanjay raut
Ganpat Gaikwad : गायकवाडांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयानं फेटाळली, सुनावणीत नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com