Raju Patil manoj jarange eknath shinde devendra fadnavis
Raju Patil manoj jarange eknath shinde devendra fadnavissarkarnama

Raju Patil : जरांगेंची प्रकृती खालावली, राजू पाटलांनी सरकारला सुनावले खडेबोल; म्हणाले...

Mla Raju Patil News : "कोण चूक आणि कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल, पण...", असंही राजू पाटलांनी म्हटलं.
Published on

आरक्षणातील सगेसोयरे तरतुदीचे कायद्यात रूपांतर करून, त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange patil ) 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सध्या जरांगेंची प्रकृती ढासळली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्रावही झाला होता. अशातच मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) सरकारला खडेबोले सुनावले आहेत. "सरकारनं फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीची दखल घेणं गरजेचं आहे," असं राजू पाटलांनी म्हटलं आहे.

Raju Patil manoj jarange eknath shinde devendra fadnavis
Narayan Rane : "आपली औकात ओळखावी अन् अंथरूणावर पडून राहावं, अन्यथा...", राणेंचा जरांगेंना इशारा

'एक्स' अकाउंटवर ट्विट करत राजू पाटील ( Raju Patil ) म्हणाले, "मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे. अशावेळी सरकारनं फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेंच्या तब्येतीची दखल घेणं गरजेचं आहे. कोण चूक आणि कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल. पण, सरकारनं कोणाच्याही जीवाशी खेळू नये."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मागील ५ दिवसांपासून जरांगेंनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालवाली आहे. बुधवारी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास जरांगेंनी नकार दिला. पण, प्रकृती खालावल्यानं जरांगेंनी उपचार करण्यास होकार दिला आहे.

Raju Patil manoj jarange eknath shinde devendra fadnavis
Prakash Ambedkar : जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवावी; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

जरांगे-पाटलांच्या मागण्या काय?

  • राज्य मागास आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्या.

  • अंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनात दाखल गुन्हे तातडीने परत घ्या.

  • हैदराबाद संस्थान, मुंबई गव्हर्न्मेंट आणि सातारा संस्थानचे गॅझेटला शासकीय दर्जा देऊन शिंदे समितीकडे द्या.

Raju Patil manoj jarange eknath shinde devendra fadnavis
Maratha Reservation : जरांगे-पाटलांची प्रकृती ढासळली; डॉक्टरही चिंतेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com