Jayant Patil-Mahayuti Leader
Jayant Patil-Mahayuti LeaderSarkarnama

Jayant Patil : दिवा विझताना जास्त फडफडतो...तशी महायुती सरकारची सध्याची अवस्था : जयंत पाटील यांची टीका

State Government : बादशहाला वाटेल आणि बादशहाच्या मनात येईल त्याप्रमाणे राज्यात निर्णय घेतले जात आहेत. अतोनात पैसा खर्च केला जात आहे.
Published on

Mumbai, 11 July : दिवा विझताना जास्त फडफडतो, तशी सध्या महायुती सरकारची अवस्था आहे. बादशहाला वाटेल आणि बादशहाच्या मनात येईल त्याप्रमाणे राज्यात निर्णय घेतले जात आहेत. अतोनात पैसा खर्च केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.

समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway), अटल सेतू, कोस्टल रोड असे विविध रस्ते करताना ज्या ठिकाणी वीस रुपये खर्च अपेक्षित होता, अशा ठिकाणी शंभर रुपये खर्च केल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केला.

...तर सभागृह का बंद पाडलं?

जयंत पाटील यांनी या वेळी मराठा आरक्षणावर देखील आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, सरकार मुद्दाम सभागृह चालू देत नाही. काल आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनीच गोंधळ घातला आणि कामकाज बंद पाडलं. तुम्हाला जर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं होतं, तर मग कामकाज का बंद पाडलं. तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम का राहिला नाही, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. या शिवाय, सरकारने आरक्षणाच्या प्रश्नाला बगल देत 94 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या पास करून घेतल्या आहेत.

Jayant Patil-Mahayuti Leader
Rahul Gandhi : राहुल गांधींना थप्पड मारली पाहिजे म्हणणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल

बादशहाच्या मनाप्रमाणे कारभार

ज्यावेळी पत्रकारांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना दहा लाख मदत दिल्याची माहिती सांगितली, तेव्हा जयंत पाटील म्हणाले, कुठे पाच लाख, मनात आलं की 25 लाख, तर कुठे दहा लाखांची मदत केली जात आहे. कोणत्या पक्षाचा आहे आणि तोंड बघून मदत केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसंच क्रिकेट संघाला 11 कोटी दिले.

सरकार पैशाचा विचार न करता वापर करत आहे. दिवा विझण्याआधी मोठा होतो, तशी सध्या राज्य सरकारची परिस्थिती आहे. सरकार घाबरलं आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीचा पराभव होणार असल्याचं भाकितही जयंत पाटील यांनी या वेळी केली.

Jayant Patil-Mahayuti Leader
Land Scam : काँग्रेसच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला जमीन घोटाळा भोवणार; सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह 10 जणांवर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com