Ashwini Bidre Killing Case : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मोठी अपडेट: बिद्रेंच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची याचना

Crime News: महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे -गोरे यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.
Ashwini Bidre and Abhay Kurundkar
Ashwini Bidre and Abhay Kurundkar Sarkarnama
Published on
Updated on

Ashwini Bidre Killing Case : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे -गोरे यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. २०१६ पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता होत्या. पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरनेच अश्विनी बिद्रें यांच्या डोक्यात बॅटने वार करुन त्यांना ठार केले अशी कबुली याच प्रकरणातला आरोपी महेश फळणीकरने दिली होती.

या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्विनी बिद्रे यांच्या यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मरण याचना केली आहे. बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी, आम्हाला मरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची केली होती. पण अचानक राज्य सरकारने जेष्ठ सरकारी वकील प्रदीप घरत यांची तब्बल 21 लाख रुपयांची फी न दिल्याने प्रदीप घरत आज न्यायालयात जाणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याने बिद्रे कुटूंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Ashwini Bidre Killing Case)

Ashwini Bidre and Abhay Kurundkar
Ajit Pawar On Sharad Pawar Threat: शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभचा मास्टरमांईड कोण? अजित पवारांचा सवाल

प्रदीप घरत यांच्या अनुपस्थितीमुळे अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यावर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही बिद्रे कुटूंबियांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहेत, मात्र आम्ही गेली 7 वर्षे शासनाच्या दारी जात असून सुद्धा न्याय मिळत नाही, अशी खंत बिद्रे कुटूंबियांनी मांडली आहे. (Crime News)

काय आहे प्रकरण?

एप्रिल २०१६ पासून अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या होत्या. मात्र त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. नोकरीत असताना बिद्रे यांची वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्याशी झाली आणि दोघांमध्ये जवळीक वाढली. (Ashwini Bidre News)

Ashwini Bidre and Abhay Kurundkar
Rais Shaikh on Voter List : आमदाराचे प्रांत कार्यालयात ठिय्या आंदोलन ; मतदार याद्यांतील घोळ संपेना..

अश्विनी बिद्रे यांनी रत्नागिरीत बदली झाल्यानंतरही अभय कुरुंदकर त्यांना भेटण्यासाठी जात होता. पण अचानक या दोघांमध्ये जेव्हा वाद होऊ लागले. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी बिद्रेंना गायब करण्याचा धमक्या वारंवार दिल्या होत्या.

२०१५ मध्ये अश्विनी यांची नवी मुंबईतील कळंबोलीत बदली झाली. 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरूंदकराला पोलिस ठाण्यात भेटायला गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाले.  अभय कुरुंदकरनेच अश्विनी बिद्रें यांच्या डोक्यात बॅटने वार करुन त्यांना ठार केले अशी कबुली याच प्रकरणातला आरोपी महेश फळणीकरने दिली होती.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com