Rais Shaikh on Voter List : आमदाराचे प्रांत कार्यालयात ठिय्या आंदोलन ; मतदार याद्यांतील घोळ संपेना..

Samajwadi Party Rais Shaikh sat on ground : प्रशासनाला कधी जाग येईल, असा सवाल रईस शेख यांनी राज्य सरकारला केला आहे.
Rais Shaikh on Voter List
Rais Shaikh on Voter List Sarkarnama

Thane News : येत्या वर्षभरात महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. निवडणुकांमध्ये महत्वाचा भाग असलेल्या मतदार याद्यांमधील गोंधळ नेहमीत चर्चेचा विषय ठरतो. अपुऱ्या माहितीच्या आधारामुळे अनेकांची नावे या यादीतून गायब झाल्याचे मतदानाच्या दिवशी समजते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी एका आमदाराने चक्क निवडणूक प्रशासनासमोर ठिय्या आंदोलन केले.

या ठिकाणी अपुऱ्या माहितीवरच मतदारांची नोंदणी केली जात असल्याचा आरोप भिवंडी पूर्वेतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. "या कार्यालयात नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहून आपले काम करावे लागत आहे," असे रईस शेख यांनी म्हटलं आहे.

Rais Shaikh on Voter List
Death threat to MP Sanjay Raut : पवारांपाठोपाठ राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, सकाळचा भोंगा बंद..

भिवंडी (Bhiwandi) उप-विभागीय कार्यालयात हा प्रकार होत असल्याचे शेख यांनी म्हटलं आहे. या कार्यालयात दलालाच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. त्यामुळे हे भिवंडी उप-विभागीय कार्यालयात हे दलालाच्या ताब्यात आहे का, असा प्रश्न आमदार शेख यांनी यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकारानंतर प्रशासनाला कधी जाग येईल, असा सवाल रईस शेख यांनी राज्य सरकारला केला आहे.

Rais Shaikh on Voter List
Ram Shinde News : पराभवाचा वचपा राम शिंदे घेतील का ? ; कर्जत-जामखेडची जबाबदारी..

या प्रकाराबाबत रईस शेख यांनी वेळोवेळी संबधीत अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली होती. याबाबत शेख यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, निवेदन दिले, पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. काल (गुरुवारी) रईस शेख यांनी ठिय्या आंदोलन केले. याबाबतचे निवेदन संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहे. तीन महिन्यात मतदार यादीतील हा घोळ दूर केला नाहीतर, आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा रईस शेख यांनी दिला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com