Eknath Shinde : 'मुख्यमंत्री शिंदे औटघटकेचे राजे'; कायदे अभ्यासक सरोदे नेमके काय म्हणाले?

Asim Sarode : शिवसेना, राष्ट्रवादीबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी चूक केली
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे यांना राजकीय पक्षाचा व्हीप, चिन्ह आणि पक्ष देखील परत मिळेल यात काही शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाच्या अनुसरून पुढचा विचार सर्वोच्च न्यायालय करावा लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे औटघटकेचे राजे आहेत, असा घणाघात कायदे अभ्यासक अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे.

शिवजयंतीनिमित्त डोबिवलीत इंडिया आघाडीच्या वतीने शिवस्वराज्य या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी व्याख्याते म्हणून उपस्थित असलेल्या सरोदेंनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री शिंदे, भाजपवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, पक्षांतर बंदी कायद्याचे प्रकरण असल्यानेच न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटीबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी देण्याचे सूचित केले. त्यांनी मात्र दिशाभूल करणारे निर्णय दिले. यातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे. ही प्रकरणे पक्षांतर बंदी कायद्याची नव्हती तर नार्वेकरांना न्याय देण्याचा कोणताच हक्क उरत नाही, याकडेही सरोदेंनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Balasaheb Thorat : काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवून देणाऱ्या विखे पिता-पुत्राचा थोरातांनी असा संपवला विषय

शिवराय फक्त राजकारणासाठी

शिवजयंतीनिमित्त संपूर्ण ठाण्यात जाहिरातबाजी करण्यात आली होती. यावर बोलताना सरोदे (Asim Sarode) म्हणाले, शिवरायांचा राजकारणात वापर होत असून ते दुर्दैवी आहे. शिवरायांनी जनतेचा एकही पैसा स्वतःच्या कामासाठी आणि प्रसिद्धीसाठी वापरला नाही. आज ते घडतेय ते पाहून मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचा भास होतोय. तुम्ही जाहिरातबाजीवर पैसा कसा खर्च करू शकता? त्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल कोणताही आदर नाही. त्यांना केवळ महाराजांचे भावनिक राजकारण करायचे आहे, असा आरोपही सरोदेंनी केला.

Eknath Shinde
NCP Breaking News : शरद पवारांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' महत्त्वाचे आदेश

निवडणूक अधिकारी भाजपचे पाळीव

कायदेशीर दृष्टिकोनातून हे सरकार अस्तित्वात येण्याचे अयोग्य आहे. निवडणूक आयोग (Election Commission) हे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालणारी एक बटीक संस्था झाली आहे. निवडणूक अधिकारी हे सगळे पाळीव अधिकारी झाले आहेत. पारवेकर हे कायदा हातात घेऊन त्यांना जसे हवे तसे करत आहेत, असा आरोप करत सरोदेंनी सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा असल्याचे नमूद केले.

भाजपचे काँग्रेसयुक्त राजकारण

आतापर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेस हा एकमेव पक्ष होता, की जो फुटला नव्हता. आता मात्र अशोक चव्हाणांनाही भाजपने समावून घेतले. भाजपला काँग्रेसमुक्त राजकारण करायचे होते, मात्र सध्या ते काँग्रेसयुक्त राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार भाजपच्या मूळ लोकांना अवडलेला नाही, असेही सरोदे म्हणाले.

मूळ भाजपात नाराजी

संस्कृतीच्या गोष्टी करतात भाजप (BJP) नेत्यांनी असंस्कृत वागण्याचा ठेका घेतला आहे. ते लोकशाहीबद्दल बोलणाऱ्यांवर हल्लाही करू शकतात. मूळच्या भाजपच्या लोकांना या गोष्टींचे अत्यंत वाईट वाटत आहे. हा असंस्कृतपणा भाजपने आयात केलेल्या गुंडांकडून होत आहे. त्यामुळे भाजपातील पुण्याचे लोक या सगळ्या प्रकरावर नाराज आहेत, असे त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Bajrang Sonwane : प्रीतम मुंडेंविरोधात निवडणूक लढवणाऱ्या सोनवणेंच्या मनात चाललंय काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com