NCP Breaking News : शरद पवारांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' महत्त्वाचे आदेश

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गटाच्या याचिकेवरील पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मूळ पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निर्णय दिला. यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाला आठवड्यात शरद पवारांच्या पक्षाला चिन्ह देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष कायम ठेवावा, असे निर्देश दिले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना (Ajit Pawar) दिला, तर शरद पवारांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळण्यासाठी निवडणूक आयोगात पर्याय सादर केले. या वेळी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष मिळाला. मात्र, चिन्ह मिळाले नाही. आता तोच पक्ष निवडणुका होईपर्यंत कायम ठेवण्याची विनंती शरद पवारांच्या वतीने न्यायालयाला केली आहे. त्यावर कोर्टानेही (Supreme Court) निवडणूक आयोगाला पुढील आदेश येईपर्यंत तो पक्ष कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
Bajrang Sonwane : प्रीतम मुंडेंविरोधात निवडणूक लढवणाऱ्या सोनवणेंच्या मनात चाललंय काय?

शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव दिले मात्र अद्यापही चिन्ह दिले नाही, याकडे लक्ष वेधले. तसेच आता मिळालेले पक्षाचे नाव आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी कायम ठेवण्याची विनंती केली. आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या प्रसार आणि प्रचार करण्यासाठी चिन्ह हे महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ते लवकर मिळावे, अशीही विनंतीही केली आहे. त्यावर ज्यावेळी मागणी करतील त्यानंतर आठवड्यातच शरद पवार गटाला चिन्ह द्यावे, असे आदेश निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले आहेत.

सिंघवी यांनी राज्यसभेच्या निवडणूक आयोगाने राज्यसभेसाठी वेगळा पक्ष दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना अजित पवार गटाचा व्हिप लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. दरम्यान, अजित पवार गटाने पवारांनी याचिका दाखल करण्यापूर्वीच कॅव्हेट सादर केले होते. तर अजित पवार गटाला तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच त्यावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता शरद पवारांनी निवडणूक आयोग आणि राहुला नार्वेकरांच्या (Rahul Narwekar) दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तीन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Ajit Pawar
Satara Loksabha News : उदयनराजेंनी ठोकला शड्डू; श्रीनिवास पाटलांचे आव्हान पेलणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com