Ganesh Naik : आमदार गणेश नाईक भाजप सोडणार? 'तुतारी' हाती घेण्याच्या चर्चा

Ganesh Naik will leave the BJP NCP SP Shivsena UBT : नाईक कुटुंबाला भाजपकडून दुर्लक्षित करण्यात येत असल्याची नाईक कुटुबांची भावना आहे. 2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते.
Ganesh  Naik-Devendra Fadnavis
Ganesh Naik-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार गणेश नाईक आणि भाजप नेते संदीप नाईक हे भाजप सोडण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 'तुतारी' किंवा 'मशाल' हाती घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात गणेश नाईक असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

नाईक कुटुंबाला भाजपकडून दुर्लक्षित करण्यात येत असल्याची नाईक कुटुबांची भावना आहे. 2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. मात्र, गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी मिळाली नाही. तसेच गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही.

गणेश नाईक हे एरोली मतदारसंघातून निवडणूक लढण्याच इच्छुक आहेत. तर संदीप नाईक हे बेलापूरमधून इच्छुक आहेत. मात्र, बेलापूर आणि ऐरोलची जागा मिळत नसल्याची ते भाजपमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे.

Ganesh  Naik-Devendra Fadnavis
Eknath Shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

गणेश नाईक यांचे नवी मुंबई परिसरात वर्चस्व आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्यामुळे गणेश नाईक भाजपमधून बाहेर पडल्यास नवी मुंबईवरील भाजपला आपले वर्चस्व गमवावे लागण्याची शक्यता आहे.

विजय नाहटा यांचा पक्षप्रवेश लांबला

बेलापूर मतदारसंघ हा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करत तुतारी हाती घेणार होते. मात्र, नाईक यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांनी नाहटा यांचा पक्षप्रवेश लांबल्याची चर्चा आहे.

Ganesh  Naik-Devendra Fadnavis
Harshvardhan Patil: 'तुतारी' हाती घेतलेल्या अन् 'आमदार'कीसाठी इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटलांवर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com