Mumbai, 01 November : माझ्या वाक्याचा आणि शब्दाचा विपर्यास करण्यात आलेला आहे. मी आयुष्यात कधीही महिलांचा अपमान केलेला नाही. कोणी तरी ठरवून नेरिटिव्ह सेट करून माझा अवमान करण्याचे काम केले आहे. उलट हा माझा अपमान आहे. मी ज्या पद्धतीने आयुष्यभर वागत आलो आहे. त्यावर लांच्छान लावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर केला.
खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आपल्याविषशी अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप नेत्या शायना एनसी (Shaina NC) यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीनुसार मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सावंत यांनी आपली बाजू मांडली आहे.
खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, मी आयुष्यात कधीही महिलांचा अपमान केलेला नाही. त्यांचं सरकार असल्यामुळे ते काहीही करू शकतात. गुन्हेगारांना सोडण्याचे काम ते करतात आणि गुन्हे नसलेल्यांना गुन्हेगार ठरविण्याचेही कामही ते करू शकतात. करूद्यात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. ती कायदेशीर कारवाई आहे. मीही त्याला सामोरे जाईन.
महिलांचा अपमान करण्याचा माझा भाव नव्हता. आता त्यांनी माझ्यावर मुद्दामहून कलमं लावून केला असेल. पण, मला आश्चर्य वाटतं की २९ ऑक्टोबरला एखादं वाक्य आलं असेल तर त्यांना एक तारखेला कशी काय जाग आली. याचा अर्थ समजून घ्या. कोणी तरी हे ठरवून नेरिटिव्ह सेट करून मुद्दामहून माझा अवमान करण्याचे काम केले आहे, असे मी उलटं म्हणेन. हा माझा अपमान आहे. मी ज्या पद्धतीने आयुष्यभर वागत आलो आहे. त्यावर लांंच्छान लावण्याचा हा प्रयत्न आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.
संपूर्ण महिला वर्गांचा अपमान आहे, असं त्यांचं म्हणणं असेल तर आशिष शेलार यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काढलेले उद्गार सभ्य होते का? संजय राठोड यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांच्यावर केलेले आरोप हे महिलांचे सन्मान करणारे होते का? कर्नाटकचे रेवण्णा प्रकरण, गुलाबराव पाटलांनी हेमामालिनींविषयी काढलेले उदगार हे सर्व महिलांचे सन्मान करणार होते का?, असा सवालही अरविंद सावंत यांनी केला.
महायुती ही मानसिक, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट लोकांची आहे. त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाला मीही कायदेशीर समोरे जाणार आहे. मुळात जी गोष्ट घडली नाही. ती घडली असं दाखवून शब्दांचा विपर्यास करून कोणी आरोप करणार असतील, तर कोर्टात त्यावर निर्णय होईल. महाराष्ट्राची जनता कोणाला बेहोल करते, हे त्यांनी २३ तारखेला बघावं, असा सूचक इशाराही अरविंद सावंत यांनी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.