Sandeep Naik : भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आज (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. नाईक यांनी निर्धार मेळावार आयोजित केला होता. या मेळाव्यात संदीप त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. आम्ही लढणार आणि आम्हीच जिंकणार, असा आत्मविश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला.
संदीप नाईक म्हणाले, 'आमच्या कार्यकर्त्यांना डावलले, त्यांचा अपमान करण्यात आला. ते आमच्या सगळ्यांच्या जिव्हारी लागले. मात्र, कोणाचा अपमान केला तर सहन करू पण नवी मुंबईच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही. काही झालं तरी नवी मुंबईचे नुकसान आम्ही सहन करणार नाही.'
'2019 मध्ये काही निर्णय घ्यावा लागला तो निर्णय नवी मुंबईच्या विकासासाठी होता. निवडणुका जाहीर झाल्यावर शब्द फिरवला. माझी कोंडी झाली तरी शहराची कोंडी नाही झाली पाहिजे म्हणून तेव्हा थांबलो. पण माझ्या सोबत आलेल्यांची कामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कार्यकर्त्यांचा अपमान झाला.', असा आरोप संदीप नाईक यांनी केला.
भाजपने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप नाईक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक अशी लढत होणार नाही. दरम्यान, आपण मुलाचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका गणेश नाईक यांनी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.