Mahavikas Aghadi : जागावाटपाचा तिढा सुटला? ठाकरेंशी तब्बल अडीच तास चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी स्पष्टचं सांगितलं

Mahavikas Aghadi Seat Sharing For Assembly Elections : बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत येत पहिल्यांचा मविआतील प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या जवळपास अडीच तास चर्चा झाली.
Uddhav Thackeray, Balasaheb Thorat
Uddhav Thackeray, Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 22 Oct : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात जागावाटपावरून मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यावरून आघाडीत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वादामुळे आघाडीत सर्वकाही सुरळीत नसल्याच्या चर्चा होत्या. याच सर्व पार्श्वभूमीवर आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्ती करत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना जागावाटपाच्या चर्चेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत येत पहिल्यांचा मविआतील प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या जवळपास अडीच तास चर्चा झाली.

या बैठकीनंतर थोरात माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "आमच्यात कोणताही वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मनात काय आहे आणि शरद पवारांना काय वाटतं हे या बैठकीत समजून घेतलं. उमेदवारांची यादी कधीही येऊ शकते. दुपारी साडेतीन वाजता महाविकास आघाडीच्या बैठक आहे. त्यामध्ये चर्चा करू," असं थोरातांनी सांगितलं.

Uddhav Thackeray, Balasaheb Thorat
Sharad Pawar Politics: `हरियाणा`ची पुनरावृत्ती नको, म्हणून महाविकास आघाडीची सावध पावले!

मात्र, थोरात आणि ठाकरेंच्या या बैठकीनंतरही काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटला का? किंवा जागावाटपावर नेमका काय तोडगा काढला? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आज होणाऱ्या मविआच्या बैठकीत नेमकी काय भूमिका घेतली जाणार आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com