Ajit Pawar : अजितदादा उमेदवारी वाटपात मोठी खेळी करणार; मुंबईत कोणतं कार्ड खेळणार?

Ajit Pawar confirmed four Muslim candidates in Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार राज्यातील प्रत्येक विभागात मुस्लिम उमेदवार देणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
Ajit pawar
Ajit pawarSakarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपपाल्या जागा वाटपावर विचारमंथन करत आहेत. काही ठिकाणच्या जागा देखील निश्चित झाल्यात.

राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या मुंबईवर वर्चस्वासाठी या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष ताकद आजमावतील. त्यामुळे सर्व पक्षांचे प्रमुख सावध निर्णय घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील मुंबईतील उमेदवारीबाबत मोठे निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत पुढील महिन्याच्या शेवटच्या तारखांपर्यंत जाहीर होईल, असे अंदाज आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडीमधील नेते जागा वाटपांच्या बैठकांमध्ये जुंपले आहेत. प्रत्येक पक्ष विजयी उमेदवार हा निकष ठेवून उमेदवार निश्चित करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shiv Sena) या पक्षाच्या फुटीनंर जे तिकीट वाटप होणार आहे, त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. मुंबईतील विधानसभा मतदारसंघात बऱ्याच राजकीय उलथापालथी होणार आहे. त्यामुळे इथं उमेदवार निश्चित करताना सर्वच पक्ष काळजी घेत आहे.

Ajit pawar
Sanjay Raut Vs Congress : 'आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या'; काँग्रेसच्या 'खुमखुमी'ला संजय राऊतांनी फटकारलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील मुंबईत मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारी आहे. तशी अपडेट समोर आली आहे. अजित पवार विधानसभा निवडणुकीला मुंबईत सर्वाधिक जागा मुस्लिमांना देणार असल्याची माहिती समोर येत आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या एकूण जागांपैकी 10 टक्के जागांवर मुस्लिम उमेदवार असतील, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईत 4 आणि एमएमआर रिजनमध्ये 1, अशा 5 जागांवर मुस्लिम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून दिला जाणार आहे. या सर्व जागांवर मुस्लिमांना उमेदवारी दिली जाण्याच्या शक्यतेला जोर पकडला आहे.

Ajit pawar
Shivsena UBT Vs BJP : 'मोदींनी 10 वर्षांत पेरलेलं विष उगवलं...' राहुल गांधींवरील टीकेचा 'सामना'मधून समाचार

अजित पवार उमेदवारी वाटपावरून जातीय गणित अवलंबणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात एकतरी मुस्लिम उमेदवार असेल, असा प्रयत्न अजित पवारांचा असणार आहे, असे सूत्रांची माहिती आहे. या पहिल्या टप्प्यात नवाब मलिक, सना मलिक, जिशान सिद्दीकी आणि नजीम मुल्ला यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी पहिले चार ते पाच मुस्लिम उमेदवार निश्चित केल्यानं पक्षातील इतर इच्छुक काय प्रतिक्रिया उत्तर देतात, याकडं लक्ष देतात, याकडे लक्ष लागलं आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक बंड करणार, असं सांगितलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीला महायुतीला मुस्लिम मतांचा चांगलाच फटका बसला. यातून महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांनी सावध पवित्रा घेतला आहे. मुस्लिमांना पक्षात सन्मानाचं स्थान असल्याचं सागून विजयी होतील, अशा मुस्लिमांची उमेदवारांची अजित पवार निश्चित करत आहेत. अजित पवार यांच्या या मोठ्या राजकीय खेळीची महायुतीमधील भाजप, शिवसेना पक्षावर काय परिणाम होतात, याकडं देखील पाहिलं जाणार आहे. भाजप लोकसभा निवडणुकीपासून प्रखर हिंदुत्वाकडे झुकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com