- जुई जाधव
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी मंत्री मंडळाच्या अनेक मंत्र्यांची ये - जा सुरु असते. शिंदे, फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर मंत्र्यांची हजेरी पहावयास मिळते. आज देखील सकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली. केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली.
ही भेट राजकीय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर विकासकामे करण्यासाठी ही बैठक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मैदानावर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याची राज ठाकरेंची संकल्पना आहे. त्यासाठी ही बैठक होती. मात्र ती संकल्पना काय आहे हे अद्यापही गुलदास्त्यात आहे. शिवाजी पार्क मैदानावर अनेक खेळाडू क्रिकेट खेळायला येतात.
अनेकांची स्वप्न या मैदानावर पूर्ण झाली आहेत, याचं मैदानावर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी काहीतरी करता यावं, अशी इच्छा राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आहे. रमाकांत आचरेकर हे नाव सगळ्यांना माहित आहे. क्रिकेट विश्वातील देवता सचिन तेंडुलकर यांना त्यांनी घडवल, त्यांचा आदर्श इतरही सर्वांना घेता यावा साठी ही बैठक असल्याचं समजत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संकल्पना राज ठाकरेंची, मात्र घरी हजेरी मंत्र्यांची...
छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सुशोभीकरण करण्याचा निर्णय राज ठाकरेंचा आहे. त्यांना अनेक सुशोभीकरणाची कामं या परिसरात करायची आहेत. कल्पना जरी त्यांची असली, तरी देखील त्या संदर्भातील बैठक घेण्यासाठी मंत्री त्यांच्या बंगल्यावर हजेरी लावतात. खासदार राहुल शेवाळे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली.
मैदानावर एक भाला मोठा तिरंगा लावायची संकल्पना राज ठाकरेंची आहे. यासाठी त्यांनी स्वतः पालिका अधिकाऱ्यांसोबत त्यांनी राज ठाकरेंच्या घरी बैठक घेतली. त्यामुळे जरी संकल्पना राज ठाकरेंची असली तरी देखील मंत्री त्यांच्या घरी उपस्थिती लावतात. यामुळे निश्चित राजकीय वर्तुळत चर्चाना उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांनी ज्यावेळेला टोलवाढी संदर्भात आवाज उठवला होता, तेव्हा आधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, मात्र त्यानंतर मंत्री दादा भुसे आणि इतर संबंधित अधिकऱ्यांनी राज ठाकरेंच्या घरी बैठक घेतली जो की कॅबिनेटचा विषय होता. यावरून देखील विरोधकांनी त्यांना सुनावलं.
युतीची चर्चा ?
राज ठाकरे यांची आणि शिंदेंच्या युतीची चर्चा सध्या जोमात सुरु आहे. अनेकवेळा राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री देखील राज ठाकरेंची भेट घेतात. त्यांच्या युतीच्या चर्चा रंगात असताना त्यांच्या नेत्यांकडून तरी सकारात्मक भावना दिसून आली. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे आता अधिकृतरित्या केवळ घोषणा होणं बाकी आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.