MVA Leaders in Trouble : ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुतीतून महाविकास आघाडीकडे उड्या मारलेले 'हे' नेते आले गोत्यात !

Political News : महाविकास आघाडीत गेलेल्यांना आता पुन्हा महायुतीची भुरळ पडली आहे. इतकेच नव्हे तर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत असलेल्या काही नेते आपल्या राजकीय भवितव्याची चिंता व्यक्त करत महायुतीचा रस्ता धरण्यास तयार झाले आहेत.
Mahayuti News
Mahayuti NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून निर्माण झालेली कोंडी यामुळे अनेक जणांनी महायुतीमधून महाविकास आघाडीचा रस्ता धरला. तर काही जणांनी पक्षाची अडचण निर्माण झाल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सल्ल्याने प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. बहुतांश 'ना घर का ना घाट का' अशीच परिस्थिती निर्माण झाली की काय ? अशी शंका आता उपस्थित होत आहे. कारण महाविकास आघाडीत गेलेल्यांना आता पुन्हा महायुतीची भुरळ पडली आहे. इतकेच नव्हे तर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत असलेल्या काही नेते आपल्या राजकीय भवितव्याची चिंता व्यक्त करत महायुतीचा रस्ता धरण्यास तयार झाले आहेत.

Mahayuti News
Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्राच्या विधिमंडळात 'हे' आमदार पती-पत्नी करणार नवा रेकॉर्ड

राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडल्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पण विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून यूटर्न घेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. सध्या पुन्हा ते महायुतीमध्ये राष्ट्रवादीत येण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती आहे. शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था असल्याने सरकारच्या विरोधात न परवडणारे असल्याने त्यांची वाटचाल राष्ट्रवादीकडे असल्याचे सांगितले जाते.

Mahayuti News
Nagpur Violence: नागपुरची दंगल कुणामुळे ? मौलानांनी लिहिलं अमित शहांना पत्र

भाजपचे (BJP) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी असलेला स्थानिक विरोध पाहता त्यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी देसाई यांनी खेळी केली. पण सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात काँग्रेसला जागा न मिळाल्याने काँग्रेस पक्षप्रवेशामुळे पंचाइत झाली की काय? असे चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देसाई गटाचे भवितव्य असणार आहे.

Mahayuti News
Nagpur Municipal Corporation Budget : नागपूर महापालिका आयुक्तांनी सादर केले इलेक्शन बजेट; मालमत्ता करात कुठलीच दरवाढ नाही

कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीची कोंडी निर्माण झाल्यानंतर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांची पावले देखील आता पुन्हा भाजपकडे वळत आहेत. वरिष्ठ स्तरावर चर्चा देखील झाल्याची समजते.

Mahayuti News
Shinde Shiv Sena : भाजप सोडून शिंदे शिवसेनेत आलेल्या संजू परब यांच्या हाती सावंतवाडीची धूरा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या सर्व प्रक्रियेला वेग येणार आहे. तर हातकणंगलेचे माजी आमदार हेच सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीत आहेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एकंदरीतच परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे झालेली पीछेहाट त्यावरून राजकीय भवितव्याची लागलेली चिंता पाहून अनेकांनी आपल्या परीने राजकीय वाटा शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Mahayuti News
Ajit Pawar : अजितदादा महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये येणार ! काँग्रेस नेते टेन्शनमध्ये; राजकीय घडामोडीना आला वेग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com