Ayodhya Ram Pran Pratistha : गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी

Govind Giri Maharaj Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेण्याची रोहित पवार यांची मागणी
Narendra Modi, Govind Giri Maharaj
Narendra Modi, Govind Giri MaharajSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya News :

अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. एवढंच नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही सन्मानानं आवर्जून उल्लेख केला. पण, त्यावेळी शिवरायांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे इतरही अनेक वाद निर्माण होऊ लागलेत. याची सुरुवात रोहित पवार यांनी ट्विट करून केली आहे.

Narendra Modi, Govind Giri Maharaj
Ayodhya Ram Mandir : देव ते देश आणि राम ते राष्ट्र; मंदिर निर्माणानंतर भारत विश्वगुरु हे टार्गेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी टीकेचा पहिला बाण गोविंदगिरी महाराजांवर सोडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला श्रीशैल्य पर्वतावर गेले होते. त्यावेळी शिवरायांची तीन दिवस उपवास केला. त्यानंतर त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली, असा दाखला गोविंदगिरी महाराजांनी दिला.

यावरून रोहित पवार यांनी गोविंदगिरी महाराजांना वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्त्व दिले. त्यामुळे सन्माननीय गोविंदगिरी महाराज आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं योग्य नाही, असं रोहित पवार यांनी सुनावलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती!, असं आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Narendra Modi, Govind Giri Maharaj
Ayodhya Ceremony : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित रथयात्रेत भाजपचे 'हे' आमदार १३ किलोमीटर चालले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com