Restricting Demonstrations in Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपोषण सोडले आणि विजयी गुलाल उधळून परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे पत्र लिहिले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत केलेल्या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे. मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकवटला, याची पोटदुखी उघड झाली आहे. शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्र्याना लिहिले. बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करा, अशी टीका राऊतांनी केली आहे.
राऊत यांनी मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्रही शेअर केले आहे. देवरांनीही सोशल मीडियात हे पत्र पोस्ट केले आहे. त्यानुसार हे पत्र बुधवारी मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचे दिसते देवरा यांनी दक्षिण मुंबईतील कोणत्याही ठिकाणी आंदोलनांना परवानगी देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचा आरोप केला जात आहे.
मिलिंद देवरा यांनी पत्रातून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी सातत्याने होणारी आंदोलने आणि गर्दीबाबत चिंता व्यक्त केली आहे. आंदोलने ही लोकशाही स्वातंत्र्यामध्ये गरजेची असले तरी सर्वसामान्यांचा कोणत्याही त्रासाशिवाय राहण्याचा आणि काम करण्याच्या अधिकारांचाही विचार करावा लागले.
दक्षिण मुंबई ही केवळ राज्य प्रशासनाचे हृदय नाही, तर राजकीय आणि आर्थिक केंद्रही आहे. मंत्रालय, विधानसभा, मुंबई महापालिकेचे मुख्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये, पश्चिम नौदल मुख्यालयही या भागात आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संस्था, कॉर्पोरेट कार्यलये आणि इतर महत्वाच्या आस्थापनांचे हे हब असल्याचे देवरा यांनी पत्रात म्हटले आहे.
आंदोलनामुळे प्रशासन, सुरक्षा अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आंदोलनांना जगातील कोणत्याही राजधानीच्या शहरात परवानगी दिली जात नाही. शांततापूर्ण आंदोलने ही लोकशाहीची महत्वाची असली त्यांचा ठिकाणांचा विचार करायला हवा, अशी भूमिका देवरा यांनी पत्रातून मांडली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र सरकारने अशा आंदोलनांना परवानगी देऊ नये किंवा त्यांची ठिकाणे दक्षिण मुंबईपासून दूर ठेवावीत, अशी विनंती केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.