Baba Siddique Shot Dead Update: बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, मोठ्या 'गँगस्टार'चा हात? दोन जण ताब्यात अन्...

NCP Leader Baba Siddique News : वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून सहा राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
baba Siddique  (1).jpg
baba Siddique (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वांद्रे पूर्व परिसरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (ता.12) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर दोन बंदुकीतून सहा राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.यातील एक गोळी सिद्दीकी यांच्या छातीला लागली होती असं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा हत्येप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून त्यातला एक जण हरियाणा आणि दुसरा उत्तर प्रदेशमधला असल्याची माहिती समोर येत आहे.

या गोळीबार करणाऱ्यांपैकी एक जण फरार झाला आहे.या हत्येमागे लॉरेन्श बिश्नोई गँगचा या हत्येत आहे का या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.या घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तीनवेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले.

baba Siddique  (1).jpg
Baba Siddque : मुंबई हादरली! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

विशेष म्हणजे महायुती सरकारकडून 15 दिवसांपूर्वी त्यांना 'Y' दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. SRA प्रकल्पातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांच्या प्राथमिक तपासात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

झिशान सिद्दिकी यांच्याबाहेर फटाके फोडत असताना तीन अज्ञातांनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर गोळीबार केला.या तिघांनी बाबा सिद्दिकींवर 6 गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला लागली होती.

या घटनेनंतर सिद्दीकी यांना तत्काळ जवळच असलेल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.

baba Siddique  (1).jpg
Uddhav Thackeray: ठाकरेंची 'शिवतीर्था'वर पुन्हा 'CM' पदाची शपथ; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न जाहीर करणाऱ्या आघाडीला इशारा

माजी मंत्री असलेले बाबा सिद्दीकी हे गेली 48 वर्ष काँग्रेससोबत होते. सिद्दीकी यांनी आठ महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सिद्दीकी यांनी 10 फेब्रुवारी 2024 ला काँग्रेसचा राजीनामा देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. गेली 48 वर्ष त्यांनी काँग्रेससोबत निष्ठेने काम केले होते.

बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्ती केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com