Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत पार पडले. या मेळाव्याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. यात ठाकरे शिंदेवर भारी पडणार की शिंदे ठाकरेंवर कुरघोडी करणार याबद्दल चर्चांनी जोर धरला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा नेहमीच्या उत्साहात झाला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर राज्यातील महायुती सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीलाही इशारा दिला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यातून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
याचवेळी त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या त्यांच्या मागणीला स्पष्टपणे नकार दर्शविणाऱ्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मुख्यमंत्रीपदावरुन इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणावेळी थेट शिवसैनिकांना आपण याच 'शिवतीर्था'वर एक शपथ घेतली होती.ती शपथ तुम्ही पुन्हा एकदा ऐका असं म्हणत थेट महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचा व्हिडिओच दाखवला.शपथविधीचा व्हिडिओ पूर्णवेळ दाखवून झाल्यावर ठाकरेंनी शिवसेनिकांना मी शपथ घेताना दिलेला शब्द पूर्ण केला की नाही. मी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असताना काम केलं की नाही असा सवालही केला.
पण ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा व्हिडिओ दसरा मेळाव्यात दाखवून एकप्रकारे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाच ललकारलं आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेत. या नेत्यांचे कार्यकर्ते याबाबत उघडपणे वक्तव्य करताना देखील दिसतात.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांनीही महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी आग्रही मागणी केली आहे. यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतली होती.
पण त्यांना त्यांच्या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.एव्हाना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी अशी पध्दत नसल्याचं सांगितलं होत.तरीही पण हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपली मागणी उचलून धरली आहे.
दसरा मेळाव्यापूर्वीच मुंबईत शिवसेना भवनाबाहेर ठाकरेंचा 'भावी मुख्यमंत्री' पदाचा उल्लेख असलेला बॅनर झळकला होता.तसेच ठाकरेंच्या आधी भाषण केलेल्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव या नेत्यांनीही ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर उघड उघड भाष्य केले होते.त्यामुळे ठाकरेंचं महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर दबावतंत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.