Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, "अजितदादा आता तुम्ही बोलाच..."; विधानसभेत नेमकं काय घडलं?

Bacchu kadu On Ajit Pawar : श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेबाबत बच्चू कडूंनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर अजित पवारांनी कडूंना आश्वासन दिलं.
ajit pawar bacchu kadu
ajit pawar bacchu kadusarkaranama
Published on
Updated on

श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तीन महिन्यांपासून मिळाले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांनी कुठेतरी बोलावं आणि सांगावं की किती दिवसांत पैसे मिळतील, असा सवाल प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी उपस्थित केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं.

यासह ग्रामपंयातीतील रोजगार सेवक आणि कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत आणावे, अशी मागणीही बच्चू कडूंनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

बच्चू कडू म्हणाले, "ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक आणि कर्मचारी हे गावस्तरावर काम करतात. त्यांचे पगार तीन-तीन महिने होत नाहीत. रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नियमित सेवेत आणलं पाहिजे. गावात काम करतोय, म्हणजे चुकीचं करतोय, असं होत नाही. नगरपालिकेत काम करणाऱ्याला नियमित सेवेत आणता. गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत निर्णय घेतला पाहिजे."

ajit pawar bacchu kadu
Video Satej Patil Vs Dada Bhuse : दादा भुसेंनी एक वक्तव्य केलं अन् सतेज पाटील तुटून पडले; नेमकं काय घडलं?

"अजितदादा ( Ajit Pawar ) तीन महिने झाले दिव्यागांना पैसे मिळाले नाहीत. संजय गांधी योजनेतून 1500 हजार रूपये मानधन देण्यात येते. ते तीन महिन्यांपासून मिळाले नाहीत. केंद्र सरकारनं एक वर्षापासून दोनशे रूपये दिले नाहीत. हा पाठपुरावा केला पाहिजे. श्रावणबाळ योजनेत केंद्राचा हिस्सा दोनशे रुपये आहे. फक्त 1300 रूपये आपण देतो. यात लक्ष घालणं फार महत्वाचं आहे," असं बच्चू कडूंनी म्हटलं.

"शुक्रवारी एक वयस्कर महिला भेटली. तिनं सांगितलं की, 'बिस्कीट खाऊन आम्ही जगतोय.' 1500 ते 1000 रूपये तिच्यासाठी आयुष्य आहे. आपल्याला दर पाच तारखेला पैसे भेटतात. मग, त्यांच्याबाबत ही व्यवस्था का होत नाही. अजितदादांकडून आम्हाला अपेक्षा आहे. श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेला पाच तारखेपर्यंत पैसे भेटले पाहिजेत, अशी तसदी घ्या. त्यावर अजितदादा तुम्ही कुठेतरी बोला की, एवढ्या दिवसांत आम्ही पाच तारखेच्या आतमध्ये पैसे देऊ," असा प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केला.

ajit pawar bacchu kadu
Fadnavis On Ajit Pawar : अर्थसंकल्प मांडताना फडणवीसांनी अजितदादांना दिलेल्या 'त्या' चिठ्ठीत नेमकं काय होतं?

यानंतर अजित पवार म्हणाले, "सभागृह संपल्यानंतर अर्थसचिवांना बोलवून घेतो. कशामुळे पैसे द्यायचे राहिले, याची शहनिशा करतो. काही प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर तातडीनं पैसे मिळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिला आहे. त्यापद्धतीनं संजय गांधी, श्रावण बाळ योजनेला पाच तारखेच्या आतमध्ये कसे मिळतील, याबद्दल नवीन आदेश काढले जातील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com