Fadnavis On Ajit Pawar : अर्थसंकल्प मांडताना फडणवीसांनी अजितदादांना दिलेल्या 'त्या' चिठ्ठीत नेमकं काय होतं?

Maharashtra Budget Session2024 : अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, दुर्बल घटकांसाठी एक लाख कोटींच्या विविध योजनांचा पाऊस पडला.
ajit pawar devendra fadnavis
ajit pawar devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 चा तब्बल 20 हजार 51 कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाजूलाच बसले होते.

यावेळी मध्येच फडणवीसांनी एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी अजित पवारांना ( Ajit Pawar ) दिली. त्यात नेमकं काय होतं? अशी चर्चा रंगली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पाचं वाचन अर्धे झालं होतं. तरी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिल माफीची घोषणा अजित पवारांनी का केली नाही? हा प्रश्न फडणवीसांना ( Devendra Fadnavis ) पडला. त्यानंतर या निर्णयाबाबत चार-सहा ओळींचा मजकूर लिहून त्यांनी अजित पवारांच्या हातात दिला.

ajit pawar devendra fadnavis
Ajit Pawar Budget Speech : 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' अजितदादांचा शायराना अंदाज..

ती चिठ्ठी पाहून अजित पवारांनी "आहे, हा विषय पुढे आहे," असं सांगितलं. पण, त्यावेळी फडणवीसांनी दिलेला मजकूर वाचून दाखवत त्यांनी वीजबील माफिची घोषणा केली आणि नंतर पुढील मुद्दांवर भाष्य केलं. अर्थसंकल्पाचं वाचन करताना छापील भाषणात वीजबिल माफीचा उल्लेख होता. त्यांनी तो पुन्हा वाचून दाखवला.

दरम्यान, चौदाव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आणि तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट निधी देणाऱ्या विविध योजनांचा पाऊस अजित पवारांनी पाडला. आगामी निवडणुकीच्या निमित्तानं घोषणांचा पाऊस पाडताना राज्याची राजकोशीय तूट एक लाख 10 हजार 355 कोटी झाल्याचंही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे.

ajit pawar devendra fadnavis
NCP Breaking News: राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात लवकरच मोठा भूकंप; 'हा' बडा नेता भाजपात प्रवेश करणार ? कुणी केला दावा..?

अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, दुर्बल घटकांसाठी एक लाख कोटींच्या विविध योजनांचा पाऊस पडला. त्यात प्रामुख्यानं 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी दरमहा 1,500 रूपये देणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना', वर्षाला तीन गॅस सिलिंडर देणार 'मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना,' शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा सवलत' योजनेंतर्गत राज्यातील 7.5 हॉर्सपॉवर वापरणाऱ्या 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com