Bachchu Kadu News : बच्चूभाऊंचा संयम संपला; शिंदे-फडणवीसांच्या उमेदवारांविरोधातच फुंकणार रणशिंग ?

Maharashtra Vidhansabha Election : बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे शिंदे-फडणवीसांची वाढली डोकेदुखी
Devendra Fadnavis, Bachchu Kadu, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Bachchu Kadu, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारचा होणार दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला पण त्यात राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांना सामावून घेण्यात आले. यामुळे शिंदे गटातील आमदारांसह अपक्ष बच्चू कडूही कमालीचे चिडले होते. मी नाराज नाही असे बच्चूभाऊ वारंवार सांगत असले तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नसल्याची खदखद मनात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चूभाऊंनी आता वेगळी चूल मांडण्याचा इशारा देत शिंदे-फडणवीस-पवार सरकारला बघून घेण्याची भाषा केली. (Latest Political News)

Devendra Fadnavis, Bachchu Kadu, Eknath Shinde
Deepali Sayyed On MNS: जेवढे रस्त्यांवर खड्डे, तेवढेच मनसेचे कार्यकर्ते; दीपाली सय्यद यांनी केले 'मनसे'चे मोजमाप

मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना बच्चू कडूंची नराजी कधी लपून राहिलेली नाही. 'मंत्रिमंडळाचा विस्तार आता नको तर २०२४ मध्येच करा. मात्र तेव्हा माझी ताकद असेल', असे सांगून स्वतंत्रपणे लढणार असल्याचे बच्चूभाऊंनी नुकतेच स्पष्ट केले. त्यामुळे आता बच्चूभाऊ किती जागा लढवणार आणि कोणाविरोधात उमेदवार उभे करणार, याकडे लक्ष असेल. काहीही असो बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी वाढू शकते.

दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागेल असा विश्वास बच्चूभाऊंना होता. मात्र यात दिरंगाई होत असल्याने आता काही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले आहे. परिणामी अधीच मंत्रिपदाच्या घोड्यावर बसलेल्या बच्चूभाऊंनी छातीवर तलवार ठेवली तरी शपथ घेणार नाही, असा नाराजीचा सूर लावला. विधानसभेत महायुतीतून सन्मानजनक जागा दिल्या नाहीतर १५-२० जागांवर स्वतंत्रपणे लढणार असल्याचा दावाही कडूंनी केला आहे. यामुळे महायुतीत खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय तोडगा काढणार, हे पहावे लागणार आहे.

Devendra Fadnavis, Bachchu Kadu, Eknath Shinde
Mungantiwar letter to Karnataka Govt. : शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारा ; मुनगंटीवारांनी कर्नाटक सरकारला खडसावले

बच्चू कडू म्हणाले, "सध्या सुरु असलेल्या राजकीय वादळात आमचे घरही उडून जाऊ नये याची काळजी घ्यावी लागत आहे. निवडणुकीत आम्हाला मनासारख्या जागा मिळाल्या नाहीतर आमची वाट मोकळी असेल. आता आम्ही १५-२० जागांवर तयारी सुरू केली असून तेथून चांगला प्रतिसाद येत आहे. सामान्या माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा पक्ष ओळखला जातो. तीच भूमिका पुढे कायम राहणार असून प्रहार संघटनेकडून मिशन विधानसभा सुरू केले आहे. आम्हाला विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात मोठा जनाधार आहे," असा दावाही बच्चूभाऊंनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com