Bahujan Vikas Aghadi : 'शिट्टी' निवडणूक चिन्ह मिळवण्यात बहुजन विकास आघाडीला यश!

Bahujan Vikas Aghadi whistle symbol : शिट्टी व बहुजन विकास आघाडी हे समीकरण बनलेले होते. मात्र 2014च्या निवडणुकीत...
HItendra Thakur
HItendra Thakur Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : जनमाणसांत आणि कार्यकर्त्यांत लोकप्रिय असलेले ‘शिट्टी` हे चिन्ह पुन्हा प्राप्त करण्यात बहुजन विकास आघाडीने यश मिळवलेले केले आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना-भाजप पक्षाने 2018च्या लोकसभा पोटनिवडणुकीत ‘शिट्टी` हे चिन्ह गोठवण्यासाठी प्रयत्न केले होते, परिणामी बहुजन विकास आघाडीला ही निवडणूक ‘रिक्षा` या चिन्हावर लढवावी लागली होती.

त्यानंतर आता या लोकसभा निवडणुकीत हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला(Bahujan Vikas Aghadi) मिळू नये, याकरता या दोन्ही पक्षांनी आटोकाट प्रयत्न चालवले होते, मात्र यावर मात करत बहुजन विकास आघाडीने हे चिन्ह मिळविल्याचे म्हटले जात असून यामुळे त्यांचा विजयाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

HItendra Thakur
Rajan Vichare News: शिंदेंची टीका झोंबली; राजन विचारे भडकले, म्हणाले, ' मला तोंड उघडायला लावू नका...'

मागील कित्येक वर्षे बहुजन विकास आघाडी ‘शिट्टी` या चिन्हावर निवडणूक लढवत आलेली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिट्टी हे चिन्ह बहुजन विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह म्हणून प्रसिद्ध होते. प्रचार मोहिमा आणि निवडणूक जाहिरातींतील कल्पकतेतूनही बहुजन विकास आघाडीने या चिन्हाला लौकिक प्राप्त करून दिलेला होता. त्यामुळे शिट्टी व बहुजन विकास आघाडी हे समीकरण बनलेले होते. मात्र 2014च्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने 2018 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत हे चिन्ह नोंदणीकृत नाही, असा आक्षेप शिवसेना-भाजपने(BJP) घेतल्याने निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले होते.

दरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजपकडून असाच आक्षेप घेतला जाईल, याची कल्पना असलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur) यांनी या चिन्हासाठी आधीच रणनीती आखली होती. त्यासाठी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राजेश पाटील यांचा 26 एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी औपचारिकरीत्या उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळी त्यांनी ‘शिट्टी` या चिन्हासाठीही दावा केला होता. शिवाय बॅकअप प्लान म्हणून शिट्टीसोबत एन्व्हलप, रिक्षा या चिन्हांचीही मागणी केली होती.

HItendra Thakur
kalyan Loksabha Election : ठाकरे गटाचे रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे, कल्याणमध्ये दुरंगी लढत

यावेळीही बविआचे उमेदवार राजेश पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या रायगडमधील व्यक्तीच्या नावाने नामांकन अर्ज दाखल करून शिवसेना-भाजपने बहुजन विकास आघाडीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निवडणूक आयोगाच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत बहुजन विकास आघाडीने ‘शिट्टी` हे चिन्ह पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे त्याआधी विद्यमान खासदार राजेंद्र गावित(Rajendra Gavit) यांचे नाव भाजप-शिवसेनेच्या उमेदवार निवडणूक यादीतून उडवण्याकरता बहुजन विकास आघाडीने वापरलेली ‘प्रेशर टॅक्टिस` यशस्वी झाली आहे. भाजप-शिवसेनेची उमेदवारी घोषणा लांबलेली असताना व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राजेश पाटील यांचे नाव जाहीर करून भाजप-शिवसेनेला ‘चेकमेट` दिला होता.

याचे परिणाम म्हणून खासदार राजेंद्र गावित यांच्या ऐवजी डॉ. हेमंत सावरा यांचे नाव महायुतीला घोषित करावे लागले आहे. प्रत्यक्षात वसई, नालासोपारा व बोईसर या बविआची ताकद असलेल्या मतदारसंघांत डॉ. हेमंत सावरा यांचा लोकसंपर्क नाही. त्यामुळे अनपेक्षित जाहीर झालेली डॉ. हेमंत सावरा यांची उमेदवारी व आता मिळालेले ‘शिट्टी` हे निवडणूक चिन्ह बविआचा विजयाचा मार्ग सुकर करते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com