kalyan Loksabha Election : ठाकरे गटाचे रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे, कल्याणमध्ये दुरंगी लढत

Loksabha Election : कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, दरेकर यांच्या उमेदवारीमुळे जुन्या शिवसैनिकांसह मित्रपक्ष देखील नाराज असल्याची चर्चा होती.
Ramesh Jadav Vaishali Darekar
Ramesh Jadav Vaishali Darekarsarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर लढत आहेत. मात्र, अचानक या जागेवर कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर, ठाकरे गटातील रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांच्या सूचनेनुसार आपण अर्ज दाखल केला असल्याच्या जाधव यांनी सांगितले होते. त्यामुळे या जागेवर ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र रमेश जाधव यांनी आज (सोमवार) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Ramesh Jadav Vaishali Darekar
Sharad Pawar News : तब्येत बिघडली तरी शरद पवारांचे काम सुरूच; हालचालींना वेग

कल्याण लोकसभा kalyan Loksabha मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, दरेकर यांच्या उमेदवारीमुळे जुन्या शिवसैनिकांसह मित्रपक्ष देखील नाराज असल्याची चर्चा होती. ठाकरे गटातील काही पदाधिकांऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे रमेश जाधव Ramesh Jadav यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगून ठाकरे गटाकडून निवडणूकीत वेगळाच ट्विस्ट आणल्याची चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैशाली दरेकर यांनी आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले होते. त्या रमेश जाधव यांनी डमी अर्ज भरल्याचे देखील सांगितले जात होते. तर आपल्याला फाॅर्म भरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले होते. मात्र, आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर लढत

रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या मुख्य लढत होणार आहे. या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष असेल. श्रीकांत शिंदे यांना पराभूत करण्याचा विश्वास ठाकरे गटातील नेते बोलून दाखवत आहेत. तर, मोठ्या लीडने श्रीकांत शिंदे जिंकतील, असे शिंदे गटातील नेते म्हणत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com