Bahujan Vikas Aghadi
Bahujan Vikas AghadiSarkarnama

Bahujan Vikas Aghadi : पालघर लोकसभेबाबत बहुजन विकास आघाडीची भूमिका गुलदस्त्यातच!

Hitendra Thakur News : निवडणुकीचा अंतिम निर्णय हितेंद्र ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

Palghar Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. पालघर लोकसभा जागेवर अजूनही कुठल्याही राजकीय पक्षाकडून उमेदवार घोषित झालेला नाही. या लोकसभा क्षेत्रात प्रमुख प्रभाव असलेल्या बहुजन विकास आघाडीने आपण पालघर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले असले तरी या पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अजून यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

त्यामुळे बविआ निवडणूक लढविणार की, कुणाला पाठिंबा देणार हे अजूनही गुलदस्तात राहिले आहे. असे असले तरी 'बविआ'च्या कार्यकर्त्यांच्या बैठका मात्र जोरात सुरू असून, निवडणुकीचा अंतिम निर्णय हा हितेंद्र ठाकूर(Hitendra Thakur) यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bahujan Vikas Aghadi
Loksabha Election 2024 : पालघरची जागा बहुजन विकास आघाडी लढवणार!

पालघर लोकसभेत सध्या शिवसेनेचा खासदार असला तरी गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. पालघर जिल्ह्यात भाजपला पुन्हा एकदा पाय रोवायचे आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिल्याने पालघर मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अजूनही हा मतदारसंघ एकनाथ शिंदे(Eknath Shinde) शिवसेनेकडे की भाजपकडे याचा निर्णय झाला नसल्याचे बोलले जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात सर्वात जास्त आमदार असलेल्या बविआच्या निर्णयाकडे महायुती आणि आघाडीचे लक्ष लागून आहे. यातच बविआने निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने निवडणुकीत रंग भरले जाणार, असे वातवरण तयार होऊ लागले आहे. तसेच निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या बविआच्या बैठकांना जोर आला असला, तरी निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय हा बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर घेणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Bahujan Vikas Aghadi
Loksabha Election 2024 : पालघर लोकसभेच्या रिंगणात 'या' संघटनेची एंट्री; समीकरणे बदलणार

बविआ पक्ष पातळीवर कार्यकर्त्यांकडून बविआचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असावा, असा सूर नेतृत्वाकडे लावला जात आहे. कार्यकर्त्यांच्या सभा होत आहेत व त्यातून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. यावर आता हितेंद्र ठाकूर काय निर्णय घेतात, यावर राजकीय समीकरणे तयार केली जाणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com