Loksabha Election 2024 : पालघरची जागा बहुजन विकास आघाडी लढवणार!

Bahujan Vikas Aghadi News : ठाणेसह अन्य ठिकाणीही उमेदवार देण्याची तयारी; बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी दिले संकेत
Bahujan Vikas Aghadi
Bahujan Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Palghar Lok Sabha Constituency : पालघर लोकसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी यांच्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच या मतदार संघात ज्यांचे जास्त वर्चस्व आहे. ती बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी, महायुतीला पाठिंबा देते की स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.

दरम्यान, गुरुवारी बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते अजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडी पालघरच्या जागेवर आपला उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत दिले.पालघर बरोबरच ठाणे आणि इतर ठिकाणीही आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत असल्याचे सांगितले.

पालघर लोकसभा मतदार संघ(Palghar Lok Sabha Constituency) निर्माण झाल्यावर या मतदार संघाचा पहिला खासदार हा बहुजन विकास आघाडीचा निवडून आला होता. त्यातंर मात्र झालेल्या तीन निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरीही आज या मतदार संघात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. बहुजन आघाडीकडे आज जिल्ह्यात ६ पैकी तीन आमदार, एक महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत असलेले सदस्य आणि उर्वरित ३ मतदार संघात असलेली पक्षाची ताकद आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे निवडणुकीत बविआ कोणाला पाठिंबा देणार याबाबत पालघर जिल्ह्यात तर्क लढविले जात होते. सद्य पालघरची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असली तरी शिवसेना ही फुटली आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते गेले असले, तरी शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या कडे आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपकडे जिल्ह्यात एकही आमदार नसल्याचा फटका त्यांना बसत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची परिस्थितीही तशीच राहिली आहे. तर आघाडीच्या पक्षाचीही जवळपास तीच गत झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आणि कम्युनिस्टचा एक आमदार या ठिकाणी आहे. त्यामुळे आघाडी आणि युती बहुजनच्या निर्णयाची वाट पाहत होते.

बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आणि समन्वयक अजीव पाटील यांनी पक्ष लोकसभेची जागा लढविणार असल्याचे सांगिल्याने सर्वच तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. याबाबत त्यांनी सांगितले याबाबत मतदार संघात बैठका आणि मेळावे सुरु आहेत. त्याच बरोबर इतर जिल्ह्यतील नेते आणि कार्यकर्त्यांकडून लोकसभेसाठी उमेदवार उभे करण्याची मागणी येत आहे. त्याबाबत पक्षाची कोअरकमिटी लवकरच निर्णय घेणार आहे. यावेळी पालघर बरोबरच इतर ठिकाणीही पक्षाचे उमेदवार दिसून येतील. असेही सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com