Ajit Pawar - Chandrakant Patil : अजितदादा -चंद्रकांतदादांमध्ये 'पुण्या'साठी चढाओढ, दोन दिवसांत स्वतंत्र बैठकांचा धडाका

Pune Political News : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री, अर्थखात्यासह पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे येईल अशी चर्चा सुरू आहे.
Ajit Pawar, Chandrakant Patil
Ajit Pawar, Chandrakant PatilSarkarnama

Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या आणि नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांनी स्वत:कडे पुण्याचे पालकमंत्रीपद ठेवले होते. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री, अर्थखाते याच्यासह पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे येईल अशी चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, दोन्ही 'दादां'मध्ये पुण्याचे पालकमंत्रीपदावरून जोरदार चढाओढ सुरू असल्याचे समोर येत आहे.

Ajit Pawar, Chandrakant Patil
Ajit Pawar And Purandar : विजय शिवतारे की संजय जगताप; पुरंदरमधून अजितदादा आता कुणाला आमदार करणार ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे शहर आणि जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समान पाणी पुरवठा, जायका, पीएमपी बस डिझेलमुक्त करणे, वाघोली येथील बाह्यवळण मार्ग यावर बैठक घेऊन चर्चा केली. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी एकत्रित उपाय योजना करावेत असेही पाटील यांनी सांगितले.

पुणे महापालिकेतील झालेल्या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) राहुल मेहवाल, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पीएमपीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर आदी यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar, Chandrakant Patil
Dr Amol Kolhe On BJP: विरोधकांचा आवाज दाबण्याची सत्ताधाऱ्यांची नीती; खासदार कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

अजित पवारां(Ajit Pawar)च्या आढावा बैठकीनंतर दोनच दिवसांत भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील विकासकामांबाबत बैठकीचा धडाका लावल्याने दोन्ही नेत्यांमध्ये पुण्यावरील वर्चस्वासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे शहरातील खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची कामे योग्य पद्धतीने होत आहेत की नाही याकडे लक्ष द्या. पॅकेजमध्ये केली जाणारी डांबरीकरणाची कामे वेळेत करा अशी सूचना पाटील यांनी केली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित उपाययोजना कराव्यात. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रयत्न करा, असे पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

Ajit Pawar, Chandrakant Patil
Maharashtra Political News : '' मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा...''; कॉंग्रेस नेत्याने टाकली ठिणगी

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए यांनी पीएमपीला देय असलेली रक्कम द्यावी असे पाटील यांनी सांगतानाच सातवा वेतन आयोग, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी याचाही आढावा घेतला. पीएमटीच्या अद्याप १२३ बसेस डिझेल इंधनावर धावत आहेत त्या येत्या दोन महिन्यात सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात. त्यामुळे पीएमटीची सेवा पूर्णपणे सीएनजी व इ-बसची होऊन प्रदूषणमुक्त होईल, तसेच बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.(Pune Political News )

वाघोली येथे सुमारे साडे चार किलोमीटरचा बाह्यवळण मार्ग आखला आहे. हा मार्ग पूर्वी पीएमआरडीएमार्फत केला जाणार होता. पण आता वाघोली महापालिकेत आल्याने पीएमआरडीएच्या मदतीने हा मार्ग महापालिका करणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही निधीची तरतूद महापालिकेने करावी असे आदेश पाटील यांनी दिले. नगर रस्त्यावर अनियंत्रितरित्या उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसेससाठी जागा निश्चित करावी, वाघोली येथे नवीन वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करावी अशा सूचनाही पाटील यांनी केल्या.

Ajit Pawar, Chandrakant Patil
BJP Political News : भाजप १४ ऑगस्ट हा 'फाळणी वेदना दिन' म्हणून पाळणार; 'त्या' कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करणार

प्रक्रिया केलेल्या पाणी वापराचा अहवाल तयार करा

समान पाणी पुरवठा योजनेच कामे वेळेत पूर्ण करा असे सांगतानाच पाटील यांनी जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेतली. हा प्रकल्प २०२५ अखेरची असून पूर्ण होणार आहे. त्यामुळे शुद्ध केलेले पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती जलसिंचन आदींना देण्यासाठी मागणी व पुरवठ्याचा अहवाल तयार करा असे आदेश पाटील यांनी दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com