INDIA Mumbai Meet : खर्गेंच्या विश्वासू खासदाराने ठाकरे गटातील नेत्यांसोबत केली पाहणी ; खासदार सावंत, नार्वेकर गुंतले तयारीत..

Mahayuti Mumbai Meeting : अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये तळ ठोकून होते.
Mahayuti Mumbai Meeting
Mahayuti Mumbai Meeting Sarkarnama

Mumbai : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या बैठकीचे यजमान पद जरी ठाकरे गटाकडे असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून या बैठकीचे आयोजन केले आहे. देशभरातून बैठकीसाठी नेते मुंबईत दाखल होत आहेत. बैठकीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे विश्वासू खासदार सय्यद नसीर हुसेन काल (गुरुवार) मध्यरात्रीपासूनच कामाला लागले आहेत.

Mahayuti Mumbai Meeting
HC On City Renaming: मोठी बातमी : औरंगाबाद, उस्मानाबाद मूळ नाव कायम; न्यायालयाकडून याचिका निकाली; राज्य सरकारकडून अधिसूचना नाही..

बैठकीचे यजमान महानगर असलेल्या मुंबईतील दक्षिण भागाचे खासदार अरविंद सावंत ,शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर यांना समवेत घेत त्यांनी हॉटेल ग्रॅड हयातची पाहणी केली. घटक पक्षांचे बडे नेते पूर्वतयारीत गुंतले आहेत आणि व्यवस्थेच्या देखरेखीकडे जातीने लक्ष पुरवले जाते आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये तळ ठोकून होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे महासचिव नरेंद्र वर्मा गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्यासमवेत असलेल्या सचिन अहिर यांच्या मदतीने विमानतळावरील वाहतूक व्यवस्था पाहत होते.कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे सहकारी मनोज त्यागी यांनीही हुसेन यांच्या बरोबरीने पाहणी केली. खासदार अरविंद सावंत, सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या समवेत साईनाथ दुर्गे यांनीही व्यवस्थेची पाहणी केली.

Mahayuti Mumbai Meeting
Swabhimani Shetkari Sanghatana News : 'स्वाभिमानी'चे प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता ; प्रशासनाची धावपळ

बैठकीत काय घडेल, लोगो कसा असेल हे सगळे दिल्लीतील बैठकीत ठरणार असून मुंबईतील ही महत्वाची बैठक व्यवस्थित पार पाडावी, यासाठी सय्यद नसीर हुसेन आणि मनोज त्यागींनी रात्रीचा दिवस केला आहे.

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (I.N.D.I.A.) ची तिसरी बैठक आजपासून मुंबईत सुरू होत आहे. ही बैठक दोन दिवस (31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर) चालेल. या बैठकीला 28 पक्षांचे सुमारे 63 नेते उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. संयोजकपदाच्या निवडीवरून या आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद दिसून आले आहेत. अनेक प्रमुख पक्ष या पदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे संयोजकपदावरही कोणाची निवड होणार? या मुद्द्यावर काय तोडगा काढला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com