Amit Shah Maharashtra Tour : अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात येणार ; मराठवाड्याच्या दौऱ्यावर..

Amit Shah In Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केली जाणार आहेत.
Amit Shah Maharashtra Tour
Amit Shah Maharashtra TourSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात शाह दाखल होतील. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अमित शाह मराठवाड्याच्या भेटीसाठी येत आहेत. (Latest Marathi News)

Amit Shah Maharashtra Tour
Rajasthan Politics : मोदी सरकारमधील नवे कायदामंत्री अडचणीत ? मुख्यमंत्री गहलोत यांनी दिले चौकशीचे संकेत

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असणार आहे. या निमित्ताने अमित शाह मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शाह उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केली जाणार आहेत.

Amit Shah Maharashtra Tour
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 'RRR' पक्षाला सुपरहिट करणार का? सभांचा लावणार धडाका..

अमित शाह यांचा मागील काळापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या दौऱ्यांच्या निमित्ताने शाह हे महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्ष देत असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर अमित शाह यांचे महाराष्ट्रावर वैयक्तिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.