MNS News : मनसेच्या बॅनरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो ! उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची जळजळीत टीका

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025 : मनसेच्या गुढीपाडव्याच्या बॅनरवर अनेक वर्षांनी पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. या पोस्टर्सवर पहिल्यांदाच ठाकरेंच्या चार पिढ्यांचे फोटो एकत्र पाहायला मिळाले.
Raj Thackeray News On Balasaheb Thackeray
Raj ThackeraySarkarnama,
Published on
Updated on

Maharashtra Politics | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर या मेळाव्याची तयारी सुरु असून ३० मार्चला मनसे प्रमुख राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क व दादर परिसरात लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.

मनसेच्या गुढीपाडव्याच्या बॅनरवर अनेक वर्षांनी पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. या पोस्टर्सवर पहिल्यांदाच ठाकरेंच्या चार पिढ्यांचे फोटो एकत्र पाहायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच प्रबोधनकार ठाकरे, राज ठाकरे व अमित ठाकरे यांचेही फोटो या बॅनरवर आहेत. त्यामुळे या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं.

Raj Thackeray News On Balasaheb Thackeray
Santosh Deshmukh case: संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड सुदर्शन घुले की वाल्मिक कराड? ही पळवाट ...

राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत आपला वेगळा पक्ष काढल्यानंतर माझा फोटो मनसेच्या बॅनरवर वापरू नका असं बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणात म्हटलं होतं. त्यानंतर मनसेच्या बॅनरवर कधीही बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो दिसले नव्हते. मात्र आता बाळासाहेब ठाकरेंचे फोटो मनसेच्या बॅनरवर पाहायला मिळाले आहेत. कडवट हिंदुत्वाची गुढी उभारायला चला शिवाजी पार्कवर असे म्हणत हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, याच विषयावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. त्यांना कळलं आहे की याशिवाय आता पर्याय नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Raj Thackeray News On Balasaheb Thackeray
RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'शंभरी' दणक्यात साजरी होणार... 3 महिन्यांचा मेगा प्लॅन जाहीर

तर संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला गेला आहे. तसा ठराव मंजूर झाला आहे, तशी मान्यता आहे. त्यामुळे माननीय बाळासाहेबांचा फोटो आता कुणीही वापरु शकतो. म्हणूनच एकनाथ शिंदेचं फावलं अशी जळजळीत टीका राऊतांनी केली.

बॅनर काढणार

दरम्यान मनसे हे बॅनर काढणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. त्याने भावनेच्या भरात हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील अशी माहिती किल्लेदार यांनी दिली आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com