Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat NewsSrkarnama

Balasaheb Thorat : कथित नाराजीपत्रावर थोरात म्हणाले, 'अरे.. अरे.. मी कधी नाराज...'

Balasaheb Thorat : माध्यमांकडून मला समजत आहे...
Published on

Balasaheb Thorat : नुकतेच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडून आल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा त्याग केला होता. मात्र त्यांचा हा राजीनामा काँग्रेसकडून नामंजूर करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पक्षातील कार्यशैलीवर अप्रत्यक्षपणे नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर काँग्रेस प्रभारी एच के पाटील आणि थोरांतांची बैठक पार पडली. यानंतर आज त्यांनी आपल्या कथित नाराजी आणि पक्षश्रेष्ठिंना लिहलेल्या पत्राबाबत अखेर भाष्य केले आहे.

Balasaheb Thorat News
Congress News : पटोले थोरातांच्या समोरच म्हणाले, 'नाराजीचं एक तरी पत्र दाखवा...'

नाराजीनाट्य व नाराजी पत्र यावर बोलताना थोरात म्हणाले, “अरे अरे अरे… मी पक्षावर नाराज होतो, हे तुम्हाला कोणी सांगितले. मी नाराज असल्याचे, मला माध्यमांकडूनच समजत आहे. मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही. जे पत्रव्यवहार हा प्रत्येक संघटनेत चालतो. तो मीदेखील केला,” असे बाळासाहेब थोरात यांनी टिप्पणी केली आहे.

राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच नाही :

१२ फेब्रुवारी बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी एच के पाटील आणि त्यांच्यात बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर थोरातांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केल्याचे पाटील यांनी सांगितले होते. पाटील म्हणाले होते की, “बाळासाहेबांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." रायपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात थोरात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. काँग्रेस परिवारातील या अंतर्गत गोष्टी आहेत. यावर कांग्रेस परिवार योग्य ते मार्ग काढतील, असेही पाटील म्हणाले होते.

Balasaheb Thorat News
Congress News : "आम्ही चव्हाणांना जबरदस्ती करू..." ; केदारांचं वक्तव्य : प्रदेशाध्यक्षापदावरून काँग्रेस घमासान?

पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर थोरात म्हणाले होते की, “प्रत्येक संघटनांमध्ये काही प्रश्न निर्माण होत असतात. तसेच ते काँग्रेसमध्येही आहेत. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे याबाबतीत काही प्रश्न होते. यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी, असे त्यांनी सुचवले होते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com