Changes In NCERT Book: गांधी हत्येनंतरची RSS वरील बंदी, नथुराम गोडसे संदर्भ पाठ्यपुस्तकातून वगळला; NCERT कडून मोठे बदल!

NCERT च्या बारावीच्या पुस्तकातील महात्मा गांधी यांच्या हत्या, गुजरात दंगली आणि आणिबाणी या घटनांसदर्भात मोठे बदल करण्यात आले आहेत.
NCERT Books Changes
NCERT Books Changes Sarkarnama

Changes in NCERT Books: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (NCERT) बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता सहावी ते बारावीची नवीन पुस्तके बाजारात आली आहेत. हे बदल गेल्या वर्षीच ठरले होते, पण नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून ठरवलेल्या बदलांव्यतिरिक्त आणखी काही गोष्टीही काढून टाकण्यात आल्या आहेत. यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने या बदलांबद्दल केलेल्या सविस्तर चौकशीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, महात्मा गांधी, नथुराम गोडसे आणि आरएसएसशी संबंधित काही माहिती NCERTच्या नव्याने छापलेल्या पुस्तकांमधून काढून टाकण्यात आली आहे

NCERT Books Changes
Avinash Bagve Gets Threatened: धमक्यांचे सत्र थांबेना: मोहोळ, बिडकरांनंतर आता काँग्रेस नेते अविनाश बागवेंना धमकी

काय काढण्यात आले होते?

- ज्यांना हिंदूंनी बदला घ्यावा असे वाटत होते किंवा पाकिस्तान जसा मुस्लिमांसाठी होता, तसाच भारत हा हिंदूंचा देश व्हावा अशी ज्यांची इच्छा होती, अशा लोकांना महात्मा गांधी विशेषतः नापसंत होते.

- #हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी महात्मा गांधींच्या दृढ प्रयत्नांमुळे हिंदू कट्टर हिंदुत्त्ववादी इतके भडकले होते की त्यांनी गांधीजींच्या हत्येचे अनेक प्रयत्न केले.

- #गांधीजींच्या मृत्यूचा देशातील जातीय परिस्थितीवर मोठा परिणाम झाला. त्यानंतर भारत सरकारने जातीय द्वेष पसरवणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई केली. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांवर काही काळ बंदी घालण्यात आली होती.

या सर्व गोष्टी बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिकवल्या जात होत्या. मात्र यंदापासून त्या शिकवल्या जाणार नाही. सोबतच, बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकातही काही बदल करण्यात आले आहेत. या पुस्तकात महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे बद्दलचीही काही महत्त्वपूर्ण माहिती काढून टाकण्यात आली आहे. या पुस्तकातून-

NCERT Book
NCERT Book Sarkarnama

काय काढून टाकले?

#गोडसे पुण्यातील एक ब्राह्मण होते.

#गोडसे हे एका हिंदू वृत्तपत्राचे संपादक होते, ज्याने गांधीजींना 'मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे'असे वर्णन केले होते.

एनसीईआरटीच्या पुस्तकातून काढून टाकलेली ही सर्व माहिती गेल्या वर्षीच्या योजनेत समाविष्ट करण्यात आली नव्हती. याबाबत एनसीईआरटीकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही.

याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एनसीईआरटीचे संचालक डी.एस. सोकलानी म्हणाले की, "सर्व बदल मागच्या वर्षीच झाले.यावेळी नवीन काहीच नाही. याशिवाय केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्थेच्या NCERT चे अध्यक्षांनीही असेच विधान केले आहे. हे शक्य आहे की काही गोष्टी टेबलने वगळल्या आहेत. परंतु यावर्षी कोणतेही नवीन बदल केले गेले नाहीत. हे सर्व गेल्या वर्षी घडले.

NCERT Books Changes
Former CM Who Served Prison: भ्रष्टाचाराचे आरोप अन् तुरुंगवास भोगलेले माजी मुख्यमंत्री

याशिवाय, मुघल काळ आणि मुस्लीम शासकांवरील मजकूरातला बराच भाग काढून टाकण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. मुघल कालखंड आणि भारतातील मुस्लिम राज्यकर्ते यांच्यावरील आशय हटवण्यात आला आहे. यात मामलुक, तुघलक, खिलजी आणि लोदी इत्यादी राजवंशांची दिल्लीतील राजवटीचा काळा आणि मुघल साम्राज्यावरील अनेक पाने इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आली आहेत.

इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील मुघल साम्राज्यावरील धडादेखील हटवण्यात आला आहे, यामध्ये हुमायून, शाहजहान, बाबर, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब यांसारख्या मुघल सम्राटांच्या कामगिरीची माहिती देणारी दोन पाने काढून टाकण्यात आली आहे.

NCERT Books Changes
Thackeray Vs Fadnavis : 'फडतूस -काडतूस' वरुन अंधारे फडणवीसांना असं का म्हणाल्या, "..तुमच्या घरात एक बाई .."

- आणीबाणीशी संबंधित भाग काढले

इतकेच नव्हे तर, इयत्ता 12वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात किंग्स अँड क्रॉनिकल्स: द मुगल कोर्ट्स (भारतीय इतिहासातील विषय-भाग II) हा अध्यायही हटवण्यात आला आहे. इयत्ता 7 च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आमचा भूतकाळ - II मध्ये, अफगाणिस्तानच्या गझनीच्या महमूदच्या दुसर्‍या अध्यायातील संदर्भ, ज्याने उपखंडावर आक्रमण केले आणि सोमनाथ मंदिरावर हल्ला, ही घटना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे.

तसेच, गझनीच्या नावावरून 'सुलतान' ही पदवी काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, आणीबाणीच्या काळातील काही भागही पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, 2002 च्या गुजरात दंगलीचे सर्व संदर्भ NCERT सोशल सायन्सच्या पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com