Gunratna Sadavarte : कोर्टानं दोषी ठरवलेल्या धनंजय मुंडेंसाठी सदावर्ते मैदानात, केस लढवणार ? करुणा शर्मांविषयी केलं मोठं विधान

Dhananjay Munde Vs Karuna Sharma Case : एकीकडे करुणा शर्मा यांच्या मुलाने धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला असताना आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेत करुणा शर्मांविषयी मोठं विधान केलं आहे.
Gunratna Sadavarte  Dhananjay Munde Karuna Sharma Case  (1).jpg
Gunratna Sadavarte Dhananjay Munde Karuna Sharma Case (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आधीच मस्साजोग हत्या प्रकरणानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे प्रचंड अडचणीत आले असतानाच त्यांच्यासमोर नवं मोठं संकट ओढावलं आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना धक्का देतानाच करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला. तसेच शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेशही दिले आहेत.

एकीकडे करुणा शर्मा यांच्या मुलाने धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला असताना आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेत करुणा शर्मांविषयी मोठं विधान केलं आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वांद्रे न्यायालयानं गुरुवारी (ता.6) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा यांच्याप्रकरणी दिलेल्या निकालावर रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ आहे. निकाल दिलेलं वांद्रे हे पहिलं न्यायालय आहे. त्यानंतर, रिव्हिजन,अपील ,रिट यांच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा मार्ग आहे. याचमुळे एखाद्या निकालावर लगेच खोलात पाय गेला,अडचणी वाढल्या,राजीनामा दिला पाहिजे,असं निकालाचं राजकारणी करण होत असल्याचा गंभीर आरोप सदावर्तेंनी केला.

तसेच वांद्रे न्यायालयानं दिलेल्या निकालाचे अनेक अर्थ कुणीही काढू नये. कुणीही निर्णयाला स्वत:चे अर्थ किंवा मुलामा लावू नये. कोर्टाच्या पुढे कुणी जाऊ नये, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी दिला.

Gunratna Sadavarte  Dhananjay Munde Karuna Sharma Case  (1).jpg
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची कबुली; म्हणाले, 'मी पुन्हा येईन,माझा पिच्छा सोडत नाही...'

याचदरम्यान, त्यांनी ही केस लढण्याबाबत आपण काही बोलणार नसून हा निकाल अंतरिम असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सदावर्तेनी यावेळी जर करुणा शर्मांना कोर्टाचा निकाल मान्य नसेल तर मग त्याचा अर्थ काय काढायचा? मग निकालावर राजकारण का होतंय? असा सवालही उपस्थित केला.

धनंजय मुंडे हे वरच्या कोर्टात जाऊन पोटगीला स्थगिती मागू शकतात. जर पुढे जाऊन या प्रकरणात मुंडेंच्या बाजूने निकाल लागला, तर करुणा शर्मांना पोटगीचे पैसे परत द्यावे लागतील अशी भूमिकाही सदावर्तेंनी यावेळी मांडली.

Gunratna Sadavarte  Dhananjay Munde Karuna Sharma Case  (1).jpg
Karuna Munde : करुणा मुंडे ढसाढसा रडल्या, सर्व सांगितलं; जेलमधील दिवस ते धनंजय मुंडेंसमोर वाल्मिक कराडने केलेल्या मारहाणीपर्यंत...

तसेच आता कायदा खूप डेव्हलप झाला असल्याचं सांगत बायकांनी नवऱ्याला पोटगी दिल्याचीही याआधी प्रकरणांचंही त्यांनी नमूद केलं आहे. सासू सूनेवर किंवा सून सासूवरही कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकत असल्याचंही सदावर्तेंनी यावेळी सांगितलं.

आपण ही केस लढण्याबाबत काही बोलणार नसून वांद्रे न्यायालयाचा निकाल निर्णय हा अंतरिम आहे. या निकालात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर असून त्यात कुठेही हिंसा केलीय असं न्यायालयानं म्हटलं नसल्याचं निरीक्षण सदावर्तेंनी यावेळी नोंदवलं. तसेच कोर्टानं या निकालात मेंटेनन्स पोटगी दिलेली आहे. त्यामुळे निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ काढण्यात यावा असंही त्यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com