Bajrang Sonwane : बीडमध्ये राष्ट्रवादीला 'बजरंग बली पावला', बप्पांचे मुंबईत वेलकम

Bajrang Sonwane News : खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलविलेल्या पहिल्या बैठकीसाठी सोनवणे मुंबईत दाखल झाले.
bajrang sonwane
bajrang sonwanesarkaranama

बीडमधील महासत्ताधीश भाजपला चारीमुंड्या चित करून बजरंग सोनवणेंनी राष्ट्रवादीच्या 'कमबॅक'मध्ये जान आणली. भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारची रसद मिळालेल्या पंकजा मुंडेंना पराभूत करून सोनवणेंनी खासदारकी खेचून आणली. पंकजाताईंच्या मदतीला धाकटे बंधू, मंत्री धनंजय मुंडेसह भाजप, नवी राष्ट्रवादी, शिंदेंच्या शिवसेनेची प्रचंड येऊनही सोनवणेंनी त्यांचा टिकाव लागू दिला नाही. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सोनवणे राजकीय वर्तुळात चर्चेत आले.

खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलविलेल्या पहिल्या बैठकीसाठी सोनवणे ( Bajrang Sonwane ) मुंबईत दाखल झाले. तेव्हा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर नव्या आठही खासदारांची ओळख करून दिली. त्यात सोनवणेंची ओळख देण्याची जयंत पाटलांची स्टाइल टाळ्या मिळवून देणारी ठरली.

बीडमध्ये आम्हाला बजरंग बली पावला, असे आमचे बीडचे नवे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, अशी ओळख जयंतरावांनी करून दिली.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

नवनियुक्त खासदार अमर काळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यानंतर जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणे यांची ओळख करून दिली. "जायंट किलर, बजरंग बप्पा सोनवणे... आमच्या पक्षाला बजरंग बली पावला... बजरंग सोनवणे यांचं स्वागत मी करतो," असं जयंत पाटीलांनी सांगितलं.

bajrang sonwane
Beed Lok Sabha Result 2024 : ‘उघडा डोळे, बघा नीट’; बीडच्या निकालाने मुंडे भावंडांना मेसेज

पंकजा मुंडेंचा पराभव...

राज्याचं लक्ष असलेल्या बीड लोकसभेची निवडणूक चुरशीची ठरली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये आघाडी, पिछाडी पाहायला मिळाली. अखेर शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेऊन बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 553 मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com