
Navi Mumbai kidnapping case : नवी मुंबईतील ट्रक क्लीनर याच्या कथित अपहरण प्रकरणात माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांना न्यायालयाने दणका दिला आहे. बेलापूर सत्र न्यायालयाने दिलीप खेडकर यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
दिलीप खेडकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर नवी मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. दिलीप खेडकर यांचा शोध सुरू केला आहे.
नवी मुंबईत (Navi Mumbai) ट्रक क्लीनर प्रल्हाद कुमार याच्या कथित अपहरण प्रकरण चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबापर्यंत पोचलं आहे. माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर या प्रकरणात आरोपी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडकर कुटुंब पुण्यातील त्यांच्या घरातून पसार झालं आहे.
मनोरमा खेडकर यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर मिळाला आहे. मात्र, दिलीप खेडकर यांचा अटकपूर्व जामीन आज बेलापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे दिलीप खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी (Police) दिलीप खेडकर यांचा कसून शोध सुरू केला आहे.
दरम्यान, मनोरमा खेरडकर यांनी ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात मी कुठेही पळून गेलेले नव्हते, असा दावा त्यांनी केला आहे. दिलीप खेडकरांवर विचारताच, मी त्यांच्याविषयी माहिती सांगू शकत नाही. करण माझा आणि त्यांचा संपर्क नाही. दिलीप खेडकर यांच्याशी घटस्फोट जाला आहे, असा दावा मनोरमा खेडकर यांनी केला. तसंच माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असेही मनोरमा खेडकर यांनी म्हटले.
या प्रकरणात मनोरमा खेडकर पहिल्यापासून तपासात सहकार्य करीत नाही. दरम्यान, अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात सकाळी सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेच्या वेळेत हजर राहण्याची सूचना केली. मात्र, निर्धारित वेळ संपल्यानंतर मनोरमा पोलिसांसमोर गेली. सांयकाळी 6 वाजल्यानंतर महिलांची चौकशी करता येत नसल्याने या नियमाचा फायदा घेण्याचा चाप्टरपणा मनोरमा खेडकर यांचा होता. तसा प्रयत्न देखील झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी प्रल्हाद कुमार भीतीमुळे गावाकडे निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात खेडकर कुटुंबांकडून तपासात पोलिसांना मिळत नसल्याचे सहकार्य, जामिनासाठी खेडकर धावपळ करत असताना मुंबई पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे वेगळीच चर्चा आहे.
दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे याने नवीन मुंबईतून ट्रक क्लीनर प्रल्हाद कुमार याचे अपहरण केले. पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगत थेट पुण्याच्या घरी नेऊन डांबून ठेवले. पोलिसांनी शोध घेत, त्याची खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्याकडून सुटका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.