Pune Police News : लायटर की पिस्तूल? कोथरूड पोलिसांचा ‘किरकोळ’ कारभार चव्हाट्यावर, हडपसरच्या टीमने केला पर्दाफाश

Kothrud Police’s Initial Claim: ‘It Was a Lighter, Not a Pistol’ : कोथरूड पोलिसांनी माध्यमांसमोर “ते पिस्तूल नव्हे, लायटरसदृश वस्तू आहे” असा दावा करत हा किरकोळ प्रकार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला.
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : काही दिवसांपूर्वी डावी भुसार कॉलनीतील श्री सुवर्ण सोसायटीत घरफोडीच्या प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे कैद झाले. या चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान देत सीसीटीव्ही मध्ये पिस्तूल दाखवलं. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर कोथरूड पोलिसांनी याबाबत खुलासा करत ते पिस्तूल नव्हे तर लायटर होते, असा ठाम दावा केला होता. मात्र आता हा दावा हडपसर पोलिसांनी फोल ठरवला आहे.

काय आहे प्रकरण?

घडलं असं की, 2 ऑक्टोबरला कोथरूडमधील परमहंसनगरातील श्री सुवर्ण सोसायटीत चोरटे घरफोडी करण्याच्या उद्देशाने शिरले. यादरम्यान त्यांना जिना उतरताना एक सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पिस्तूल दाखवत पोलिसांना उघड आव्हान दिलं होतं.

याबाबत पोलिसांना विचारणा करण्यात आल्यानंतर कोथरूड पोलिसांनी माध्यमांसमोर “ते पिस्तूल नव्हे, लायटरसदृश वस्तू आहे” असा दावा करत हा किरकोळ प्रकार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अवघ्या सहा दिवसांतच या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड झाला आहे.

Pune Police News
Shiv Sena symbol dispute : पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा; कोर्टाने सिब्बलांना थेट CJI गवईंकडे जाण्यास सांगितले...

सहा दिवसांनी हडपसर पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान दोन १७ वर्षीय अल्पवयीनांना वाहनचोरी च्या संशयावरून पकडलं. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केलं. तरुणांची सखोल चौकशी केल्यानंतर यातील एक तरुण हा कोथरूडमधील सीसीटीव्हीत पिस्तूल दाखवणारा तोच आरोपी आहे, असं तपासात समोर आलं.

Pune Police News
Durga Shakti Nagpal : महिला जिल्हाधिकाऱ्यांना दणका; सरकारी बंगल्यावर कब्जा करणे पडले महागात

आरोपीकडे मिळालेलं पिस्तूल हेच त्या घटनेतील पिस्तूल असल्याचं स्पष्ट झालं. चौकशी केली असता या दोघांकडून तब्बल ८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोथरूड मधील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला असताना ज्या पोलिसांनी सत्य तपासून सगळी माहिती देणे आवश्यक होतं,  त्याच पोलिसांना लायटर आणि पिस्तूलातील फरक कळत नसेल तर मग नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com