Bhalchandra Mungekar : शाईफेकीवर भालचंद्र मुणगेकरांची चंद्रकांत पाटलांना विनंती : ‘चंद्रकांतदादा, तुमच्यावर विश्वास ठेवायचा असेल...’

उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना कमीत कमी भीक, मदत, आर्थिक साहाय्य, देणगी यातला फरक कळला पाहिजे.
Bhalchandra Mungekar-Chandrakant Patil
Bhalchandra Mungekar-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करणे, हा तुमचा हेतू नव्हता. यावर जर आम्ही विश्वास ठेवायचा असेल तर ज्या लोकांनी शाई फेकली, त्यांच्यावरही विश्वास ठेवून त्यांच्यावर ३०७ आणि इतर १० अशी एकूण ११ कलमं लावली आहेत. ती कलमंही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर (Bhalchandra Mungekar) यांनी केली. (Bhalchandra Mungekar request to Chandrakant Patil in ink throwing case)

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भालचंद्र मुणगेकर बोलत हेाते. त्यावेळी मुणगेकर यांनी पाटील यांना वरील विनंती केली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार दिवसांपूर्वी बोलताना ‘महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर पाटील यांनी भीक मागून शाळा उभारल्या,’ असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आली. त्या प्रकरणी शाई फेकणाऱ्यांवर ११ कलम लावून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मुणगेकर बोलत होते.

Bhalchandra Mungekar-Chandrakant Patil
Anil Deshmukh Gets Bail: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १३ महिन्यांनंतर मोठा दिलासा मिळाला; पण...

ते म्हणाले की, महात्मा फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारणीसाठी भीक मागितली, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी केले. त्यांचं असं म्हणणं आहे की मी या महापुरुषांचा अपमान केलेला नाही. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना कमीत कमी भीक, मदत, आर्थिक साहाय्य, देणगी यातला फरक कळला पाहिजे, अशी माझी तरी अपेक्षा आहे.

Bhalchandra Mungekar-Chandrakant Patil
Rajan Patil News : राजन पाटलांच्या लोकनेते परिवाराच्या फलकावर पुन्हा झळकले पवार कुटुंबीय!

चंद्रकांत पाटील यांच्याशीही माझे व्यक्तीगत संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरेाबही माझे उत्तम संबंध आहेत. मात्र, त्याचा गैरअर्थ घेऊ नका. ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि मी नियोजन आयोगाचा सदस्य असताना आमच्यात भांडणही झाले होते. त्यावेळी मी त्यांना, ‘मोदीजी क्या चल रहा है गुजरातमें,’ असे विचारले होते. त्यावर त्यांनी क्या चल रहा है मतलब. त्यांनी नियोजन आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष मॉटेक्यसिंह अहलुवालिया यांच्याकडे विचारणा केली की तुमचे सदस्य अशी का विचारणा करत आहेत. मी म्हटलं की ‘आपको मालूम नही है, क्या चल रहा है... ’ गोव्याच्या विमानतळावर अटलबिहारी वाजपेयी असे म्हणाले की ‘मोदींजीने राजधर्म का पालन नही किया.’ अपने सुना नही... त्यामुळे व्यक्तीगत संबंधांचा गैरअर्थ काढू नका, असे आवाहनही मुणगेकर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com