Anil Deshmukh Gets Bail: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १३ महिन्यांनंतर मोठा दिलासा मिळाला; पण...

सक्तवसुली संचनालयापाठोपाठ (ईडी) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रकरणातही मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) तब्बल १३ महिन्यानंतर अखेर मोठा दिलासा दिला आहे. सक्तवसुली संचनालयापाठोपाठ (ईडी ED) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय CBI) प्रकरणातही मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना जामीन (Bail) मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने हा जामीन दिला आहे. (Former Home Minister Anil Deshmukh gets big relief after 13 months; But...)

कथित शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते तथा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशमुख हे २ नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयातही तो कायम राहिला होता. मात्र, सीबीआयच्या प्रकरणात ते तुरुंगात होते.

Anil Deshmukh
Rajan Patil News : राजन पाटलांच्या लोकनेते परिवाराच्या फलकावर पुन्हा झळकले पवार कुटुंबीय!

दरम्यान, सीबीआयच्या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी देशमुख यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर माजी गृहमंत्र्यांना न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आठ दिवसांची वेळ सीबीआयकडून मागण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना तब्बल १० दिवसांचा कालावधी अपिल करण्यासाठी दिला आहे.

Anil Deshmukh
Pandharpur Corridor संदर्भात अफवा पसरविणाऱ्यांना फडणवीसांनी हात जोडून केली विनंती; म्हणाले ‘मंदिरं अन मठ...’

देशमुख यांच्या वकिलाने सांगितले की, शंभर कोटी वसुली प्रकरणात माफीचे साक्षीदार सचिन वाझे याच्या जबाबतील विसंगती, त्याने वेळोवेळी घेतलेली भूमिका यावर आम्ही सविस्तर युक्तीवाद केला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया न राबविता देशमुख यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली. त्याबाबत आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले.

Anil Deshmukh
Soapur News : 'समृद्धी'चा कार्यक्रम संपवला अन्‌ जेवणही न करता तुमच्या दर्शनासाठी सोलापुरात आलो

या प्रकारणातील मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंंग आणि माफीचे साक्षीदार सचिन वाझे या दोघांनी तपास यंत्रणेला जे जबाब दिले होते. त्यात विसंगती होती आणि ते तथ्यहीन होते. असा सविस्तर युक्तीवाद आम्ही केला. न्यायालयाने आमचा युक्तीवाद ग्राह्य धरून अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे, असे देशमुख यांच्या वकिलाने सांगितले.

Anil Deshmukh
Gurav Samaj Convention : गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : संत काशिबा विकास योजनेची केली सुरुवात

राष्ट्रवादीचे नेते देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मात्र, त्या जामिनीला दहा दिवसांची स्थगिती देण्यात आल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. देशमुख समर्थकांना जल्लोष करण्यासाठी आणखी दहा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com