Bharat Gogawale:उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यावर राणेंचा डोळा; गोगावले संतापले

Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand: राणे बंधुंना काहीतरी बोलल्‍याशिवाय करमत नाही. निकाल लागल्यानंतर मतदारसंघावर त्‍यांनी दावा करणे चुकीचं आहे. भाजपमध्‍ये उलटसुलट घडामोडी घडल्या. त्‍या आम्‍ही सांगायच्‍या का?
Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand
Bharat Gogawale Reaction on Rane Brothers DemandSarkarnama

Ratnagiri News: अटीतटीच्या लढतीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे शिलेदार विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पाडाव केला आहे. महायुतीतील काही जणांनी आपल्याला मदत केली नाही, अशा नेत्यांना प्रत्युत्तर देणार असा थेट इशारा राणेंनी दिला आहे. त्यावर शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहे.

नितेश आणि निलेश राणे यांनी ट्विट करून शिंदे गटातील नेते उदय सामंत यांच्‍या रत्‍नागिरी बरोबरच राजापूर मतदार संघावर दावा ठोकला आहे. त्यावर शिंदे गटातील आक्रमक नेते भरत गोगावलेंनी राणेंना सडेतोड उत्तर देत फटकारलं.

राणे बंधुंना काहीतरी बोलल्‍याशिवाय करमत नाही. निकाल लागल्यानंतर मतदारसंघावर त्‍यांनी दावा करणे चुकीचं आहे. भाजपमध्‍ये अनेक ठिकाणी उलटसुलट घडामोडी घडल्या. त्‍या आम्‍ही सांगायच्‍या का? तिथं आम्‍ही दावे करायचे का, असा उलट सवाल गोगावले यांनी केला आहे. "नारायण राणे यांना तिकीट मिळणे अवघड होते, आमच्‍या मतांवरच ते विजयी झाले,यांची आठवण भरत गोगावले यांनी राणेंना करून दिली आहे.

उदय सामंत यांनी सुद्धा काम केल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. आपल्या मुलांनी तसेच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यामुळे आपण विजयी झालो, असे नारायण राणे यांनी सांगितले असले तरी उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यावर राणे बंधुचा डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand
Sanjay Mandlik: नेटकऱ्यांकडून 'सूर्याजी पिसाळ' चा शोध सुरु: मंडलिकांच्या पराभवाने वादाला फुटलं तोंड

राणे बंधुंच्‍या दाव्‍यांवर भाजप नेते कुणीही विचारणार नाही. अन्यथा विधान परिषद पदवीधरच्या जागेबाबत आम्‍हालाही विचार करावा करावा लागेल. नारायण राणे यांना तिकीट मिळताना अडचण आली होती. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या किरण सामंत यांची समजूत काढली म्‍हणून त्‍यांना एवढी मते मिळाली. राणे बंधूनी सांभाळून बोलावे असा सूचक इशारा गोगावले यांनी दिला आहे.

राणे यांनी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा त्यांनी ४७,९१८ मतांनी पराभव केला. राणेंच्या या विजयामुळे विनायक राऊत यांचा सलग तिसऱ्यांदा खासदारकी जिंकून विजयाची हटट्रिक करण्याचे स्वप्न भंगले. राणेंच्या विजयानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com