Sanjay Mandlik: नेटकऱ्यांकडून 'सूर्याजी पिसाळ' चा शोध सुरु: मंडलिकांच्या पराभवाने वादाला फुटलं तोंड

Kolhapur Lok Sabha 2024 Analysis: मित्राच्या गोठात राहून शत्रूची मदत करणारा कोण? अशी विचारणाच थेट सोशल मीडियातून मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे कागल आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Kolhapur Lok Sabha 2024 Analysis
Kolhapur Lok Sabha 2024 AnalysisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत खासदार संजय मंडलिक यांचा पराभव झाल्याने कार्यकर्त्यांना चांगलाच चेव चढला आहे. लोकसभा निवडणुकीत डझनभर महायुतीचे नेते, गोकुळ-जिल्हा बँकेचे दोन डझनभर संचालक, साखर कारखान्याच्या यंत्रणा राबून देखील खासदार संजय मंडलिक यांचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नेते प्रचार यंत्रणेत सक्रिय असले तरी शेवटच्या क्षणी कोणी दगाबाजी केली. सूर्याची पिसाळाची भूमिका कोणी स्वीकारली? याचा शोध घेण्यासाठी आता खासदार संजय मंडलिक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

समाज माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. मित्राच्या गोठात राहून शत्रूची मदत करणारा कोण? अशी विचारणाच थेट सोशल मीडियातून मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे कागल आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात खासदार मंडलिक यांच्या पराभवाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

खासदार संजय मंडलिक यांचे होमटाऊन असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघ आणि बालेकिल्ला असणाऱ्या चंदगड आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात कमी मताधिक्य मिळाले आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून जवळपास 64 हजाराची मताधिक्य शाहू महाराज छत्रपती यांना मिळाल्याने महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे.

कागल चंदगड आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा माजी खासदार मंडलिक यांचा बालेकिल्ला समजला जातो. या तिन्ही मतदारसंघात महायुतीचे प्रबळ नेते सपशेल फेल ठरले आहेत.

अपेक्षित मताधिक्य कागल चंदगड आणि राधानगरीतून मेल असा अंदाज खासदार मंडलिक यांना होता. मात्र अपेक्षित मताधिक्य सोडा,जेमतेम आघाडी देखील या मतदारसंघात मिळाली नाही . त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आता पाल चुकचुकायला सुरुवात झाली आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समर्जीत घाटगे हे दोघे सक्षम असताना केवळ मंडलिक यांना 13 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्या भूमीकेवर मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांना संशय आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, भाजपचे शिवाजीराव पाटील प्रबळ महायुतीकडे असताना मतदार संघात देखील मंडलिक यांची पीछेहाट झाली.

Kolhapur Lok Sabha 2024 Analysis
Jalna Lok Sabha 2024 Analysis: सत्तार-भुमरे यांच्याकडूनही रावसाहेब दानवेंचा 'करेक्ट' कार्यक्रम..

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर कोणी गद्दारी केली? याचा शोध आता नेटकऱ्यांकडून सुरू आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे प्रतिस्पर्धी आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील हे लोकसभेला एकत्र होते.

युतीधर्म पाळत के पी पाटील यांनी मंडलिक यांचे मेळावे घेतले. मात्र बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा राग मनात धरून के पी पाटील यांनी कोणता गेम केला? हे मताधिक्यावरून कार्यकर्त्यांच्या ध्यानात आले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.

आता समाज माध्यमांवर मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांकडून सूर्याची पिसाळ याचा शोध घेण्याचे सुरू आहे. नुकसान शत्रू से नही, मित्रत्व का दिखावा करणे वाले से है अशा शब्दात मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवत महायुती मधील गद्दारांचा शोध घेण्याची मोहीम सुरु ठेवली आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com