Bhiwandi Building Collapse : 'लगेच बाहेर पडा...', अधिकाऱ्याच्या एका धाडसाने वाचले अनेक जीव; पुढच्या 10 मिनिटांतच कोसळली इमारत

Assistant Commissioner Arvind Ghogare : सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कोणतीही जोखीम न पत्करता थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन रहिवाशांना तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन केले.
Assistant Commissioner Arvind Ghogare at the Bhiwandi building collapse site, where his timely intervention reportedly helped save numerous lives.
Assistant Commissioner Arvind Ghogare at the Bhiwandi building collapse site, where his timely intervention reportedly helped save numerous lives.sarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi News : भिवंडीतील भीषण इमारत दुर्घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांच्या प्रसंगावधानामुळे आणखी मोठी जीवितहानी टळल्याची माहिती समोर आली आहे.

इमारतीला तडे जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना बाहेर काढले. विशेष म्हणजे, घोगरे इमारतीबाहेर पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत इमारत कोसळली.

सायंकाळी सहा वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नगरसेवक यशवंत टावरे यांनी प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांना माहिती दिली. रात्री साडेदहाच्या सुमारास घोगरे हे कर्मचारी सुमीत जाधव यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.

परिस्थितीची गंभीरता ओळखून घोगरे यांनी कोणतीही जोखीम न पत्करता थेट इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन रहिवाशांना तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मदत केली. त्यांच्या सूचनेनंतर रहिवाशांनी तातडीने इमारत रिकामी केली.

Assistant Commissioner Arvind Ghogare at the Bhiwandi building collapse site, where his timely intervention reportedly helped save numerous lives.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार ; समुद्रकिनारी 23 व्या मजल्यावरून चालणार महाराष्ट्राचा कारभार

रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढून घोगरे स्वतः इमारतीबाहेर पडले आणि अवघ्या दहा मिनिटांत संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. या धाडसी आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Assistant Commissioner Arvind Ghogare at the Bhiwandi building collapse site, where his timely intervention reportedly helped save numerous lives.
Namo Drone Didi Yojana 2026: महिला बचत गटांसाठी केंद्र सरकारची मोठी योजना! ड्रोन खरेदीवर 80% अनुदान, कमाईचीही संधी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com