CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार ; समुद्रकिनारी 23 व्या मजल्यावरून चालणार महाराष्ट्राचा कारभार

Air India Building, New CM Office Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार असून जागा ठरली आहे. लवकरच या नवीन इमारतीत कार्यालयाचे स्थलांतर केले जाणार आहे.
CM Devendra Fadnavis,
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra CM Office : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील मुख्य प्रशासकीय कार्यालयाचा पत्ता लवकरच बदलणार आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय मुंबईतील नरिमन पॉइंट येथील समुद्र किनारी असलेल्या अलिशान अशा २३ मजल्यांच्या एअर इंडिया इमारतीत हलविण्यात येणार आहे. इमारतीच्या सर्वात वरच्या अर्थात २३ व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे हायटेक कार्यालय असेल.

CM फडणवीस यांच्या कार्यालयासोबतच मंत्रालय इमारतीबाहेरील विविध सरकारी विभागाची कार्यालये देखील या इमारतीत स्थलांतरीत होणार आहेत. या निर्णयामुळे विविध शासकीय कार्यालयांच्या भाड्यापोटी राज्य सरकारचा होणारा २०० कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे.

1955 मध्ये बांधलेल्या त्या काळच्या सचिवालयात आणि आताच्या मंत्रालयात जागेच्या तीव्र कमतरतेमुळे राज्य सरकारला सरकारच्या इतर विभागांसाठी जवळपासच्या परिसरात सुमारे 90 लाख चौरस फूट जागा भाड्याने घ्यावी लागली होती. साहजिकच कोट्यवधी रुपये या भाड्यापोटी सरकारला मोजावे लागत आहेत.

CM Devendra Fadnavis,
Maharashtra Government : 24 तासांत राज्य सरकारचा यू-टर्न ! मंत्र्यांची छापील वृत्तपत्रे बंद करण्याचा निर्णय अखेर मागे

त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री कार्यालयासह विविध सरकारी विभागांची कार्यालये या नवीन इमारतीत हलविल्यानंतर भाड्यापोटी जाणाऱ्या जवळपास २०० कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. भाड्यापोटी खर्चले जाणारे हे पैसे वाचविण्याचे प्रयत्न सरकारचे सुरू आहेत.

राज्य सरकारने नरिमन पॉइंट येथील समुद्रकिनारी असलेली 23 मजल्यांची एअर इंडिया इमारत एक हजार 601 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, एअर इंडिया इमारत 1994 मध्ये राज्य सरकारच्या जमिनीवर बांधण्यात आली होती. आता ही इमारत राज्य सरकारच्या ताब्यात आल्याने नजिकच्या काळात या इमारतीमध्ये मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री आणि सरकारी विभागांची कार्यालये हलविण्यात येणार आहेत.

CM Devendra Fadnavis,
Shalarth ID Scam : अटकेतील भाजप नेत्याला हॉस्पिटलमध्येच ठेवण्याची धडपड : 160 कोटींच्या घोटाळ्याचं चौकशीत बिंग फुटण्याची भीती

योजनेनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवीन कार्यालय या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर, म्हणजेच 23 व्या मजल्यावर असणार आहे. तर, 22 व्या मजल्यावर 13,663 चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक कॅबिनेट हॉल बांधण्यात येणार आहे.

एअर इंडिया इमारतीचे महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरण हा राज्याच्या प्रशासकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com