Bhiwandi Mahapalika : भाजपचा दिग्गज नेता चावी फिरवण्याच्या तयारीत; काँग्रेसच्या हाता-तोंडाशी आलेलं महापौरपद थोडक्यात हुकणार?

Bhiwandi Nizampur Municipal Corporation : भिवंडी निजामपूर महापालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने महापौरपदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष सुरू असून, किंगमेकरांची भूमिका सत्तेचा कौल ठरवणार आहे.
Senior BJP leaders and local powerbrokers engaged in strategic discussions as the Bhiwandi Nizampur Municipal Corporation mayoral race enters a decisive phase amid a fractured mandate.
Senior BJP leaders and local powerbrokers engaged in strategic discussions as the Bhiwandi Nizampur Municipal Corporation mayoral race enters a decisive phase amid a fractured mandate.Sarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Politics News : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. त्याचवेळी सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने तर शुक्रवारी नगरसेवकांची बैठकही घेतली असून या महापौरपदाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 30 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत. या दोघांकडे एकत्रित 42 जागा आहेत. त्याचवेळ भाजपने 22 आणि शिवसेनेने 12 जागा जिंकल्या आहेत. या भाजप-शिवसेना महायुतीकडे एकत्रित 34 जागा आहेत.

यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 46 या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सध्या समाजवादी पक्षाच्या 6, कोणार्क विकास आघाडीकडे 4 आणि भिवंडी विकास आघाडीच्या 3 आणि एका अपक्ष नगरसेवकाचे महत्त्व वाढले आहे.

भिवंडीच्या राजकारणात 'किंगमेकर' मानले जाणारे कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांची भूमिका यंदाही महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे काही नगरसेवक विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यांच्या मदतीने सत्तेचे पारडे कोणत्या बाजूला झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Senior BJP leaders and local powerbrokers engaged in strategic discussions as the Bhiwandi Nizampur Municipal Corporation mayoral race enters a decisive phase amid a fractured mandate.
Mira-Bhayandar Mayor : मीरा-भाईंदरमध्ये 'महिला राज', सलग पाचव्यांदा महापौरपद!

गेल्या वेळी काँग्रेसकडे बहुमत असतानाही विलास पाटील यांच्या रणनीतीमुळे प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. यंदा मात्र 'काँग्रेसचाच महापौर बसेल,' असा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात असतानाच, भाजपनेही सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

Senior BJP leaders and local powerbrokers engaged in strategic discussions as the Bhiwandi Nizampur Municipal Corporation mayoral race enters a decisive phase amid a fractured mandate.
भाजप कार्यालयावर घमासान, Mahesh Chaughule आणि माजी महापौर Vilas Patil समर्थकांमध्ये राडा। Bhiwandi

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काही विशेष 'राजकीय 'खेळी खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेत कोणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने येत्या काळात नगरसेवकांची फोडाफोडी आणि 'अर्थकारणा'ला ऊत येण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com