Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा झटका; घाटकोपरमधील 'या' नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

Shivsena Political News : ''कोणाच्या तरी इगोमुळे इतकी वर्ष...''
Thackeray Vs Shinde, Kiran Landge
Thackeray Vs Shinde, Kiran Landge sarkarnama

Mumbai : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिंदेंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेतील इन्कमिंग सुसाट आहे. यात ठाकरे गटातील महत्वाच्या नेतेमंडळींचा शिवसेना प्रवेश घडवून आणण्यासाठी शिंदे आग्रही आहे. याच दरम्यान आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत शिवसेने(Shivsena)(शिंदे गट) त प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. यावेळी लांडगे यांनी आज मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं म्हटलं आहे...

Thackeray Vs Shinde, Kiran Landge
Narendra Modi : चीनची दादागिरी अन् पाकिस्तानची गुंडगिरी खपवून घेणार नाही; अमेरिकेचा इशारा

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठामधून अनेकजण खऱ्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. जी कामे थांबली होती, ती आता होताना दिसत आहेत. ती कामे युद्ध पातळीवर आम्ही हातात घेतली आहेत..कोणाच्या तरी इगोमुळे इतकी वर्ष ही कामे थांबली होती. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)नी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं. यावेळी त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर विकासकामांसाठी असा मिश्किल टिप्पणीही शिंदेंनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून आम्ही सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करत आहोत. मुंबईमध्ये तुम्हाला आता एक खड्डाही दिसणार नाही. तुम्हाला मुंबई सुधारताना दिसत आहे.ठिकठिकाणी रोषणाई आपण पाहत आहात ती कायमस्वरूपी आहे. हे सगळं का होतंय याचा सगळ्यांना त्रास सुरु झालाय. मग सगळे बोलू लागले आहेत. हिशोब तर झाले पाहिजेत.ऑडिट तर झाले पाहिजे.

Thackeray Vs Shinde, Kiran Landge
Mantralay News : मंत्रालयातील मंत्री, अधिकारी थंडगार; कर्मचारी, जनता घामेघूम !

पण आमचं सर्व उघड आहे.ज्यांना पोटदुखी आहे त्यांना मोफत उपचार दिले आहेत.सर्व प्रकल्पावर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आम्ही करणार आहोत.

2017 मध्ये किरण अपक्ष लढला आणि म्हणून सगळ्यांची तुझ्यावर नजर होती. आणि मग मी तुला शिवसेनेत प्रवेश दिला. आणि आता लांडगे यांना खऱ्या शिवसेनेत प्रवेश दिला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com