Mahavikas Aaghadi Meeting : 'मविआ'ची पुढची रणनीती ठरली ; 'वज्रमूठ' सभा पुन्हा 'युती' सरकारची धडधड वाढवणार

Maharashtra Politics : '' जे सोडून गेले त्यांची चिंता नाही...''
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि आमदार भाजपसोबत गेले आहेत. अजितदादा सत्ताधारी पक्षात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत आहेत. तरीही ते पुण्यातील नरेंद्र मोदी यांच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रामाला हजर राहू नये अशी आघाडीच्या नेत्यांची भावना होती. तरीही पवार कार्यक्रमाला हजर राहिले.

मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत बुधवारी महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक चर्चगेट येथील एमसीए लाऊन्जमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण यांसह विविध नेतेमंडळींचा या बैठकीत समावेश होता. आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं.

Mahavikas Aghadi
Raj Thackeray On Nitin Desai Death : '' ही वेळ त्यांच्यावर कशामुळे आली...'' ; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंची मोठी मागणी

महाविकास आघाडी(MVA)च्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडणार आहे. या वज्रमूठ सभाद्वारे आघाडी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. आपली मोठी शक्ती, जे सोडून गेले त्यांची चिंता नाही. तसेच ऑगस्टनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस(Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआच्या बैठकीवर भाष्य केले. ते म्हणाले, तीनही पक्षांनी एकत्र फिरायचं, एकत्र लढायचं, एकत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायचं, एकत्र राहायचं, एकत्र वज्रमूठ सभा घ्यायच्या, अशी चर्चा झाली. या सरकारने खोटा प्रचार करुन लोकांना फसवलं आहे त्याचा पर्दाफाश करायचा, असंही या बैठकीत ठरलं आहे.

Mahavikas Aghadi
Pradeep Kurulkar Case: हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या डॉ.प्रदीप कुरुलकरांचा जामिनासाठी अर्ज; ९ ऑगस्टला होणार सुनावणी

'' राज्यात पुन्हा वज्रमूठ सभा...''

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी बैठकीनंतर म्हणाले, आम्ही तीनही मित्रपक्ष एकत्र आहोत. आम्ही तीनही मित्रपक्ष एकत्र लढणार आहोत. जनमानस आमच्याबरोबर आहे. आम्ही आता काही काळाने विभागवार बैठका सुरु करु. लवकरच वज्रमूठच्या सभादेखील सुरु होतील. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वज्रमूठ सभा घ्यायच्या आहेत. पण पावसानंतर सभा सुरु होतील. आपण आमचं दोन आठवड्याचं कामकाज पाहिलं आहे. आजचंही कामकाज पाहिलं आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समर्थपणे लढतोय, असं जनतेमध्ये सुद्धा वाटतंय. कोणतीच अडचण नाही. आमच्या आमदारांची संख्या कमी झाली असेल पण स्पिरीट कमी झालेलं नाही अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com