Cabinet Meeting Decisions : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मंत्रीमंडळात मोठा निर्णय; पण अंमलबजावणी कधीपासून?

Decision for Agriculture Electricity : शेतकऱ्यांसाठी स्वस्त वीज देण्यासाठी देशात महाराष्ट्राचा पहिला प्रयत्न
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Government and Agriculture : सध्या दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच भारनियमनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेऊन आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत सौर कृषी योजना-२ राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या प्रकल्पासाठी आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार उपलब्ध आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला जमीनी द्याव्यात, असे आवाहनही सरकारच्या वतीने फडणवीस यांनी यावेळी केले आहे.

Devendra Fadnavis
Cabinet Meeting Decisions: राज्य सरकारचे 12 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना होणार 'हा' फायदा

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने 'फिडर सोलरिझेशन'चा निर्णय घेतलेला आहे. जे कृषीचे फिटर आहे त्याच्या 'सोलर रिझर्वेशन' करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपली जमीन ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर सरकारला द्यायची आहे. तरी आम्ही हेक्टरी सव्वा लाख रुपये शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर दरवर्षाला यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करणार आहोत. करार संपल्यानंतर ३० वर्षांनी शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळणार आहे."

Devendra Fadnavis
Mamata Banerjee On Amit Shah Call: तर मी राजीनामा देईल... ममता बॅनर्जींचे सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान

या 'फिडर सोलर' प्रकल्पामुळे वीजेचे दर कमी होण्यास मदत होणार असल्याचेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावा केला. फडणवीस म्हणाले, आज आपण सात रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना वीज देत आहोत. त्यात सबसिडी आहे. सोलारची जी वीज आहे ती आपण दिवसा देणार आहोत. तसेच त्या विजेचे दर फक्त तीन रुपये ते तीन रुपये २७ पैशांना मिळणार आहे.

Devendra Fadnavis
Uddhav Thackeray news : शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग!

या निर्णयामुळे पर्यावरणाला फायदा होणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीसांनी सांगितले की, "राज्यात 'फिडर सोलर' प्रकल्प सुरू झाला तर कोळशामुळे होणारी पर्यावरणाची हानी होणार नाही. शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीनी सोलर वीज निर्मितीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील पहिले राज्य ठरले आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com