Cabinet Meeting Decisions: राज्य सरकारचे 12 मोठे निर्णय; शेतकऱ्यांना होणार 'हा' फायदा

Shinde-Fadnavis government : शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Shinde-Fadnavis government
Shinde-Fadnavis governmentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. तसेच दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता केंद्र सरकार प्रमाणे राज्यात दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू केलं जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू होणार आहे. तर शेती पंपाना दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविण्यात येणार आहे.

Shinde-Fadnavis government
Bhokar Market Committee News: इच्छुकांची संख्या वाढल्याने चव्हाणांकडून जुन्या संचालकांना थांबण्याच्या सूचना..

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते मोठे निर्णय झाले?

- शेती पंपाना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविण्यात येणार आहे. वर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा देण्यात येणार. (ऊर्जा विभाग)

- राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करण्यात येणार आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण लागू होणार. (सामान्य प्रशासन )

- पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता‌ देण्यात आली. (विधि व न्याय)

Shinde-Fadnavis government
SPPU Viral Rap Song: रॅप साँगला परवानगी देणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्याचीच चौकशी होणार

- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापन करण्यात येणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

- पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा (सहकार)

- खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही. (महिला व बालविकास)

- राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

- आता बी.एस्सी.पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना विद्यावेतन मिळणार आहे. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

- ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ (ग्राम विकास)

- पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (नगरविकास विभाग)

- मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता (मराठी भाषा विभाग)

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com