Ratan Tata Passed Away : मोठी बातमी! उद्योगविश्वातला ध्रुवतारा निखळला; उद्योगपती रतन टाटा यांचं निधन

Ratan Tata Death News : दोन दिवसांपूर्वीच टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Ratan Tata Dead
Ratan Tata DeadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.मात्र,त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.अखेर त्यांनी बुधवारी (ता.9) रात्री उशिरा टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा (Ratan Tata) यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते..त्यांच्या अनेक शारीरिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. डॉ. शाहरुख हे एक नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात.

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले होते. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर परदेशात शिक्षण घेतले. त्यांची एकूण 3,800 कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली होती.त्यात त्यांनी'वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत,काळजी करण्यासारखं काहीही नाही,असं टाटा यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

Ratan Tata Dead
Tuljapur constituency : तुळजापूरमध्ये बाजी पलटणार ? राणाजगजितसिंह पाटलांची प्रतिष्ठा पणाला; कोणाचे आहे आव्हान ?

देशाच्या कानाकोपऱ्यातून रतन टाटांच्या प्रकृती स्वास्थासाठी व ते लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केल्या जात आहे.सोशल मीडियातून त्यांच्यासाठी 'गेट वेल सून' यांसारख्या मेसेजद्वारे पोस्ट केले जात आहे. टाटा कंपनीच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचं त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं आहे. अनोखी देशभक्ती व देशहिताचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. ते 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर समूहाचे पाचवे अध्यक्ष बनले होते. रतन टाटा यांना वर्ष 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं.

Ratan Tata Dead
Eknath Shinde News : सीएम शिंदेंचा शब्द; म्हणाले,आबिटकरांचा मंत्रिपदाचा बॅकलॉग भरून काढणार, पण...

रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस सारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले होते. त्यांनी नॅनो सारखी कार बनवून सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होतं. याशिवाय त्यांनी इंडिका सारखी प्रसिद्ध कारही बाजारात आणली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com