Rohini Khadse News : राष्ट्रवादीत खांदेपालट; रोहिणी खडसेंकडे मोठी जबाबदारी,महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

NCP Political News : रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत.
Rohini Khadse
Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर आता शरद पवार गटाने महत्वाच्या नियुक्त्याची घोषणा करताना बीडच्या सभेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बबन गितेंसह विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांना संधी देण्यात आली आहे. तर बीडचे बबन गित्ते यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर विद्या चव्हाण(Vidya Chavan) यांची मे २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता सव्वा वर्षांनंतर राष्ट्रवादीत खांदेपालट करताना रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Rohini Khadse
Baban Gitte News: राष्ट्रवादीत प्रवेश करताच बबन गित्तेंना शरद पवारांचं मोठं गिफ्ट; सोपवली 'ही' जबाबदारी

कोण आहेत रोहिणी खडसे..?

रोहिणी खडसे (Rohini Khadse ) या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. त्या शिक्षणाने एक वकील आहेत . त्यांना रोहिणी खडसे-खेवलकर या नावाने सुद्धा ओळखले जातात. त्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.

रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व त्या २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.मात्र, त्यांचा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष होत्या. आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना , घोडसगाव या कारखान्याची संचालक आहे.(NCP)

Rohini Khadse
Nawab Malik News : नवाब मलिकांना दुसरा दिलासा ; हमीदार सादर करण्याची मुदत महिनाभराने वाढवली

रोहिणी खडसे यांनी २३ ऑक्टोंबर २०२० ला एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता. एकनाथ खडसेंना विधान परिषदेची आमदारकी दिल्यानंतर आता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com